Lemon Market Rate : आवक घटल्याने लिंबाच्या दरात पुन्हा वाढ; आणखी भाववाढीची शक्यता!

Lemon Market Rate Today 29 May 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : लिंबू बाजारात सध्या चढ-उतार काहीसा पाहायला (Lemon Market Rate) मिळत आहे. मागील पंधरवड्यात आवक वाढल्याने लिंबू दर काहीसे घसरले होते. मात्र, आता पुन्हा एकदा बाजारात लिंबाची आवक कमी झाली असून, लिंबू दर चढतीला लागले आहेत. सध्याच्या घडीला बाजारात लिंबाला शेकडा ४०० ते ४५० रुपये तर किरकोळ विक्री सहा रुपये प्रति नग इतका दर मिळत आहे. लिंबाच्या आकारानुसार बारा रुपयांना दोन किंवा तीन लिंबू मिळतात. मागील पंधरवड्यात लिंबाचे दर प्रति मग पाच रुपयांहून (Lemon Market Rate) कमी झालेले पाहायला मिळाले होते.

शेकडा ३५० ते ४०० रुपये दर (Lemon Market Rate Today 29 May 2024)

यंदाचा उन्हाळा संपत आला आहे. मात्र, अजूनही उन्हाचा तडाखा (Lemon Market Rate) कमी झालेला नाही. अनेक भागांमध्ये कमाल तापमान ४७ ते ४८ अंशांपर्यंत पोहचले आहे. तर काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटा पाहायला मिळत आहे. ज्यामुळे शीतपेये, लिंबू सरबत यांची मागणी वाढली आहे. परिणामी, लिंबाची मागणी वाढली असली, तुलनेने आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. प्रामुख्याने अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे बाजारात लिंबाची आवक घटली आहे. याउलट आवक कमी झाल्याने लिंबाला सध्या घाऊक बाजारात शंभर रुपये प्रति किलो, तर शेकडा ३५० ते ४०० रुपये इतका भाव मिळत आहे.

लिंबाचे भाव आणखी वाढणार

मे महिन्यामध्ये आवक थोडी कमी-जास्त होणे, परिणामी दरात चढ-उतार हे नेहमीचेच चित्र असते. यंदाही तेच चित्र आहे. सध्या आवक मध्यम स्वरूपात आहे. किरकोळ लिंबू विक्री ४ ते ६ रुपये नग (Lemon Market Rate) आहे. लिंबाची मागणी जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वाढत राहील, तोपर्यंत लिंबाचा दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा एका लिंबू व्यापाऱ्याने म्हटले आहे.

शेतकऱ्यांना चांगला फायदा

दरम्यान, गेल्या दोन वर्षात लिंबू-कोकमचा वापर वाढला ओहे. लिंबाचे दर वाढल्यामुळे सरबताऐवजी पर्याय म्हणून कोकमचा वापर अनेकांनी सुरू केला आहे. मात्र. इतर पेयांपेक्षा लिंबू सरबत आरोग्याला हितकारक असल्याने यंदा लिंबूने चांगलाच भाव खाल्ला. वाढत्या उन्हाने लिंबूला बाजरात चांगली मागणी असलेली दिसून आली. ज्यामुळे यंदा लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला आहे.