हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यामध्येगेल्या आठवड्यात कांद्याच्या बाजारभावात (Onion Market Rate) घसरण झाली होती.आजही वेगवेगळ्या ठिकाणी कांदा भावात चढ- उतार दिसत आहे.सोलापूर आणि धुळ्यासारख्या काही बाजारपेठेत कांद्याच्या दरात (Onion Rate) घसरण, तर कोल्हापूर आणि मंगळवेढा सारख्या बाजारपेठेत वाढ झाली आहे.
कोल्हापूर बाजारपेठेत (Kolhapur Bajar Samiti) कांद्याचा भाव 30 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे, जो निर्यातबंदी उठल्यानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक भाव (Onion Market Rate) आहे.
दुसरीकडे, सोलापूर, धुळे आणि जालना सारख्या बाजारपेठेत कांद्याचा किमान भाव 100 ते 300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत आहे.
कमी आवक आणि साठवणुकीमुळे भाव वाढीला चालना (Onion Market Rate)
राज्यातील बहुतांश मंडईमध्ये कांद्याची आवक कमी आहे. निर्यातबंदी उठूनही भावात फारसा बदल न झाल्याने अनेक शेतकरी आता कांदा साठवून ठेवत आहेत. रब्बी हंगामातील कांदा ऑक्टोबर पर्यंत साठवता येतो, त्यामुळे शेतकरी तातडीने विकण्याऐवजी साठवणूक (Onion Storage) करण्यास प्राधान्य देत आहेत.
बुधवारी राज्यातील केवळ तीन मंडईमध्ये 10 हजार क्विंटलपेक्षा जास्त कांद्याची आवक झाली. पिंपळगाव-बसवंत येथे सर्वाधिक 20 हजार क्विंटल कांद्याची विक्री झाली.
विविध बाजारपेठेतील कांद्याचे दर (Onion Market Rate)
जालना: किमान 150 रुपये, कमाल 1300 रुपये, सरासरी 800 रुपये प्रति क्विंटल
जुन्नर: किमान 300 रुपये, कमाल 2600 रुपये, सरासरी 1200 रुपये प्रति क्विंटल
धुळे: किमान 100 रुपये, कमाल 1100 रुपये, सरासरी 1600 रुपये प्रति क्विंटल
लासलगाव: (Lasalgaon Onion Market) किमान 500 रुपये, कमाल 1701 रुपये, सरासरी 1380 रुपये प्रति क्विंटल
कांद्याच्या दरात (Onion Market Rate) चढ-उतार कायम आहेत. काही बाजारपेठेत भाव चांगले आहेत तर काही बाजारपेठेत शेतकर्यांना कमी भावाला कांदा विकावा लागत आहे.