Milk Rate : अमूल दुधाच्या दरात वाढ, आजपासून मोजावे लागणार इतके रुपये!

Amul Milk Rate Increased By 2 Rupees
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अमूल दुधाच्या किमतीत (Milk Rate) दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. याबाबत गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांची वाढ जाहीर केल्याचे अधिकृतरीत्या सांगितले आहे. आजपासून अमूल दूध खरेदी दोन रुपयांनी महाग होणार आहे. अमूलच्या नवीन किमतींनुसार, अमूल गोल्ड 500 मिली लिटरमागे 2 रुपयांनी (Milk Rate) वाढून ३३ रुपये झाले आहे. आजपासून (ता.३) या किंमती लागू होणार आहेत.

अमूलकडून प्रसिद्धीपत्रक जारी (Amul Milk Rate Increased By 2 Rupees)

गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात सांगितले की, “एकूणच ऑपरेशन आणि दुधाचे उत्पादन खर्च वाढल्याने दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. “किमती वाढल्याने अमूलच्या तिन्ही प्रमुख दुधाच्या प्रकारांवर परिणाम होईल. अमूल गोल्ड, अमूल शक्ती, अमूल टी-स्पेशल याच्या किंमतीत वाढ कऱण्यात आली आहे.”

‘हे’ आहेत नवीन दर

अमूल गोल्ड, अमूल शक्ती, अमूल टी स्पेशल या दूधाच्या किंमतीत वाढ झाली आहे. आता अमूल गोल्डची किंमत 66 रुपये प्रति लीटर इतकी झाली आहे. याधी अमूल गोल्डची किंमत (Milk Rate) 64 रुपये प्रति लीटर इतकी होती. अमूल टी स्पेशलची किंमत 62 रुपयांवरुन 64 रुपये प्रति लीटर झाली आहे. इतकेच नाही तर अमूल शक्तीचा भाव 60 रुपयांवरून 62 रुपये प्रतिलिटरपर्यंत वाढणार असून, दह्याचे दरही वाढले आहेत. दरम्यान, फेब्रुवारी 2023 पासून दुधाच्या किंमतीमध्ये कोणताही वाढ करण्यात आलेली नव्हती. पण दुधाचे उत्पादन खर्च वाढल्याने दुधाच्या किंमतीत वाढ करावी लागत असल्याचे गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने सांगितले आहे.

उत्पादन खर्चात वाढ झाल्याने निर्णय

प्रति लिटर दोन रुपयांची वाढ म्हणजे एमआरपीमध्ये 3-4 टक्के वाढ होते. जी सरासरी अन्नधान्य महागाईपेक्षा खूपच कमी आहे. फेब्रुवारी 2023 पासून अमूलने प्रमुख बाजारपेठांमध्ये दुधाच्या किंमतीत कोणतीही वाढ केलेली नाही, असे जीसीएमएमएफने म्हटले आहे. दूध उत्पादन आणि ऑपरेशन खर्चात वाढ झाल्यामुळे दुधाच्या किंमतीत वाढ केल्याचा दावा अमूलने केला आहे. गेल्या वर्षी अमूलच्या दूध संघांनी शेतकऱ्यांच्या दरात सरासरी 6 ते 8 टक्क्यांनी वाढ केली होती.