Weather Forecast: मराठवाडा विभागात कुठे बरसणार पाऊस? जाणून घ्या सविस्तर अंदाज!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: आज महाराष्ट्रात पावसाची शक्यता (Weather Forecast) वर्तविण्यात आलेली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने (VNMKV) मराठवाड्यात (Marathwada Region) या आठवड्यात हवामानाचा अंदाज (Weather Forecast) कसा असेल याबद्दल अंदाज व्यक्त केलेला आहे. जाणून घेऊ या सविस्तर.  

मराठवाड्यासाठी हवामान अंदाज (Weather Forecast)

  • मराठवाडयात पुढील पाच दिवसात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पूर्व मौसमी पावसाची (Monsoon Rain) शक्यता आहे.
  • आज 05 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात तर दिनांक 06 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 07 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 08 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड व धाराशिव जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पूर्व मौसमी पावसाची (Pre Monsoon Rain) शक्यता आहे (Weather Forecast).
  • मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात (Marathwada Temperature) हळूहळू 3 ते 4 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.
  • विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 07 ते 13 जून दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त व किमान तापमान सरासरी एवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
  • जिल्हानिहाय व तालुका निहाय छायाचित्रानुसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित कमी झालेला आहे.
  • विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 09 ते 15 जून 2024 दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा कमी, कमाल तापमान व किमान तापमान सरासरी एवढे राहण्याची शक्यता आहे(Weather Forecast).
Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.