राज्याने राबवलेल्या कृषी धोरणामुळे, लॉकडाऊनमध्ये होईल विक्रमी उत्पादन: विश्वजित कदम

Vishwajit Kadam
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी | राज्यामध्ये गेल्या वर्षीच्या कृषी हंगामात महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या कृषी धोरणांमुळे राज्यात बारा टक्के जास्त शेतीचे उत्पादन झाले. यावर्षीही चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे आणि राज्य शासनाने खरीप पिकांचे योग्य नियोजन केल्यामुळे, यावर्षी राज्यात शेतीचे विक्रमी उत्पादन होईल. असा विश्वास कृषी राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांनी व्यक्त केला आहे. सांगलीमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.

गेल्यावर्षी करोणाच्या परिस्तिथीमुळे करण्यात आलेल्या लोकडॉनमुळे अनेक व्यवसाय आणि उद्योगाचे नुकसान झाले. पण शेती आणि शेतीतील उत्पादने यामुळे अन्नधान्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ शकले. यावर्षीही चांगला पाऊस आणि मोठ्या प्रमाणात पेरण्या झाल्यामुळे उत्पादन चांगले होईल. अशी अपेक्षा शेतकऱ्यांसोबत सरकारही करत आहे.

हवामान खात्याने यावर्षी मान्सून वेळेत दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजावरून राज्य सरकारने आवश्यक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा स्तरावर पालकमंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये खरिपाच्या बैठकी पार पडल्या असून त्यातून आवश्यक सूचना आणि निर्णय सर्व प्रशासकीय पातळीवर देण्यात आले आहेत असेही त्यांनी सांगितले.

 

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा