Monsoon Update: राज्यात ‘या’ तीन जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यामध्ये 6 जून रोजी मॉन्सून (Monsoon Update) दाखल झाला असून, तो रत्नागिरी आणि सोलापूर भागात स्थिर आहे. त्याची पुढील वाटचाल आजपासून (8 जून) होईल. दरम्यान, पुढील पाच दिवस राज्यामध्ये (Maharashtra Monsoon) वि‍जांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिला आहे.

मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह ‘यलो अलर्ट’चा (Yellow Alert For Wind Storm) इशारा देण्यात आला आहे. राज्यामध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस (Monsoon Update)  होत आहे.

यंदा कमी वेळेमध्ये अधिक पाऊस असा पॅटर्न (Monsoon Pattern) राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला होता. अगदी तसाच पॅटर्न सध्या पाहायला मिळत आहे. पुण्यामध्ये त्याचा फटका बसला आहे. कात्रज, लोहगाव आणि वडगाव शेरीला ढगफुटीसारखा पाऊस पाहायला मिळाला.

सध्या मॉन्सून (Monsoon Update) आल्याने राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मॉन्सूनच्या सरींनी गारवा तयार केला आहे. रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर हा दक्षिण भाग सोडला, तर राज्यातील उर्वरित भागात पूर्व मोसमी पाऊस होत आहे.

दरम्यान, सध्या उत्तर गुजरात मध्ये चक्राकार वाऱ्याची स्थिती असून, मध्य प्रदेशपासून पश्चिम बंगालपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. नैऋत्य मॉन्सून मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, महाराष्ट्राच्या काही भागात पुढे जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. मॉन्सूनचा दक्षिण कोकणात मुक्काम असून, पुढील वाटचाल करण्यासाठी पोषक वातावरण तयार झालेले आहे (Weather Update).

दक्षिण कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पूर्व मोसमी जोरदार पावसाचा (Monsoon Update) अंदाज आहे, अशी माहिती ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली.

वादळी वाऱ्यासह पावसाचा ऑरेंज अलर्ट
9 जून : कोल्हापूर (Kolhapur), सिंधुदुर्ग (Sindhudurg)
10 जून : कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी
11 जून : कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा (Satara)