Maharashtra Weather Update: पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज! काही ठिकाणी रेड अलर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: नैऋत्य मॉन्सूनची धडक (Maharashtra Weather Update) पुणे, धाराशिव, लातूर, नांदेडपर्यंत पोहोचली असून, एक-दोन दिवसांत मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र तो व्यापेल, अशी माहिती हवामान विभागाने (IMD) दिली. दरम्यान, राज्यामध्ये (Maharashtra Weather Update) काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.

पुढील दोन दिवस कसे असणार हवामान? (Maharashtra Weather Update)

मध्य महाराष्ट्र आणि कोकणात (Konkan) काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच तुरळक ठिकाणी अति मुसळधार पावसाची (Heavy Rainfall) शक्यता आहे.

विदर्भात (Vidarbha) तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांमध्ये मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी काही भागांमध्ये मॉन्सून (Monsoon Update) जाईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे (Maharashtra Weather Update).

महाराष्ट्रात मॉन्सून (Monsoon In Maharashtra) गुरूवारी (6 जून) सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सोलापूरमध्ये आला होता. त्यानंतर आता तो मराठवाड्यातील आणि प. महाराष्ट्रातील काही भागात पोहोचला आहे. दोन दिवसांपूर्वी मॉन्सून दक्षिण कोकण आणि बारामतीपर्यंत पोहोचला होता.

त्यानंतर शनिवारी (8 जून) मॉन्सूनने विश्रांती घेत आपला मुक्काम तिथेच ठोकला. त्यानंतर रविवारी पुणे येथे मुसंडी मारली. शनिवारी मॉन्सूनमुळे रत्नागिरी, सातारा, सोलापूर जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली, तर पुणे जिल्ह्यासह लातूर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यांच्या काही भागांत मॉन्सून पोहोचला. तिथेही काही भागात पाऊस झाला.

रविवारी मात्र राज्यामध्ये पावसाने बहुतांश भागामध्ये विश्रांती घेतली. राज्यात सर्वाधिक पाऊस छत्रपती संभाजीनगर येथे 20 मिमी झाला, तर सोलापूरात 0.4 मिमी, मुंबईत 0.2 मिमी, बीड 1 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.