मुंबईत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस; पुढील चार दिवस अतिवृष्टीचे, हवामान खात्याचा इशारा.

Rain Paus
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केरळमध्ये मान्सूनने यंदा तीन जून रोजी हजेरी लावली. त्यानंतर मान्सूनची एक्सप्रेस महाराष्ट्रात देखील वेगानं पुढे सरसावत आहे. येत्या एक-दोन दिवसातच मुंबईत मान्सूनच्या सरी पोहोचणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे लवकरच मान्सून मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात हजेरी लावणार आहे. येत्या चार-पाच दिवसात मुंबईसह उत्तर कोकणात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD)दिला आहे. तसेच ठाणे, पालघर आणि मुंबई या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजापेक्षा देखील यंदा मान्सूनने राज्यात आधीच हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. शनिवारीच रत्नागिरीच्या हरणे मध्ये मान्सूनचे आगमन झाले. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि सोलापूर मध्ये देखील मान्सूनने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. मात्र मुंबईत मान्सून कधी दाखल होणार याची सर्वजण वाट पाहत असताना आता मान्य असूनही मुंबई येत्या एक -दोन दिवसात हजेरी लावेल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून आदेश

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 10 जून पासून मान्सूनला सुरुवात होण्याची शक्यता आहे. राज्यातील मान्सून स्थितीचा आढावा घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही संकटाला सामोरं जाण्यासाठी तयार राहण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. राज्य प्रशासनाने सखल भाग, भुस्कलन होणाऱ्या जागा आणि किनारपट्टी जवळील नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्याचे आदेश दिले आहेत. अतिवृष्टीच्या काळात आवश्यक तिथं NDRF आणि SDRF च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. धोकादायक इमारती, दरड ग्रस्त भागात लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याची सूचना देखील करण्यात आली आहे.