हॅलो कृषी ऑनलाईन: बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाल्याने मॉन्सून (Monsoon Update) सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. याचाच परिणाम म्हणून राज्यात (Monsoon In Maharashtra) अनेक ठिकाणी पावसाचा जोर (Heavy Rainfall) वाढला आहे. कोकण (Konkan) आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे, तर विदर्भात (Vidarbha) वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे (Monsoon Update).
काल शुक्रवारी कोकण आणि घाटमाथ्यावर तसेच पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील जेवती येथे सर्वाधिक 170 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कोकण, विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस (Monsoon Update) झाला.
आज कोकणातील रायगड, रत्नागिरी सह पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (Orange Alert) हवामान विभागातर्फे (IMD) देण्यात आलेला आहे.
पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा (Monsoon Update), तर विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (Yellow Alert) देण्यात आला आहे.
मराठवाडयात (Marathwada) आज व उद्या काही ठिकाणी आणि दिनांक 01 व 02 जूलै रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे ओडिशाच्या किनाऱ्यालगत वायव्य बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.
राजधानी दिल्लीसह मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, उत्तराखंड, राजस्थान, उत्तर प्रदेशचा आणखी काही भाग मॉन्सूनच्या (Monsoon Update) छायेत आला आहे.
पुढील दोन ते तीन दिवसांत देशाच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्यास पोषक हवामान होत आहे.
या पावसामुळे नद्यांमध्ये पूर येण्याची शक्यता आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.