हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्राला (Maharashtra Weather Update) गेल्या दोन दिवसांपासून झोडपून काढणार्या पावसाचा जोर (Monsoon) पुढील तीन दिवस कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तविला आहे.
कोकण (Konkan) व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भ (Vidarbha) व मराठवाड्यात (Marathwada) तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगजना व विजांचा कडकडात होण्याची शक्यता आहे (Maharashtra Weather Update).
पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण पट्टयात पावसाचा जोर वाढणार आहे (Maharashtra Weather Update).
त्यामुळे मंगळवारी रायगडला रेड तर मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Monsoon Orange Alert) देण्यात आल्याचे हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख सुनील कांबळे यांनी सांगीतले.
सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना बुधवारी आणि गुरूवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर शुक्रवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी आहे (Maharashtra Weather Update).
24 तासांत 169 मिमी, लोणावळ्यात मुसळधार
लोणावळ्यात रविवारी 24 तासात 169 मिमी (6.65 इंच) पावसाची नोंद झाली. रविवारी दिवसभर कोसळल्या नंतर सायंकाळ नंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. शनिवार व रविवार असे दोन दिवस लोणावळ्यात जोरदार पाऊस (Heavy Rainfall) झाला. त्या दोन दिवसात शहरात 385 मिमी (15.15 इंच) पाऊस झाला.
मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात रविवारी 24 तासांत 81 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
भातसात 49 तर बारवीत 42 टक्के वाढ (Maharashtra Weather Update)
गेल्या दोन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भातसा धरणात 49 टक्के तर बारवी धरणात 42 टक्के पाणीसाठा झाला आहे.