हॅलो कृषी ऑनलाईन: शेतीला पूरक (Success Story) म्हणून दुग्धव्यवसाय (Dairy Business) मोठ्या प्रमाणात केला जातो. या व्यवसायातून जर मोठ्या प्रमाणात नफा कमवायचा असेल तर योग्य मार्केटिंग, संशोधन आणि कष्ट करणे गरजेचे आहे. हेच सिद्ध करून दाखविले सोलापूरच्या (Solapur District) मोहोळ तालुक्यातील शेज बाभूळगाव इथले दूध उत्पादक शेतकरी (Dairy Farmer) शशिकांत पुदे (Shashikant Pude) यांनी.
शशिकांत पुदे (Success Story) यांचा वडिलोपार्जित देशी गायींचा (Desi Cow) गोठा होता. त्यात त्यांनी शेती विकासासोबत काजळी खिल्लार गायींची संख्या वाढवली व या गायींचा गोठा उभारला. सध्या दुधाळ गायी आणि वळू त्यांच्या गोठ्यात आहेत.
शशिकांत पुदे यांच्या गोठ्यात 1 गाय दररोज सरासरी 8 ते 10 लिटर दूध देते. सध्या गोठ्यात 9 गायी, 2 कालवडी आणि 3 वळू आहेत. त्यापैकी 6 खिल्लार गायी दुधाळ आणि 3 गाभण आहेत. पुदे दरवर्षी 4 कालवडी आणि 2 खोंड विकतात. विशेष म्हणजे शेतकऱ्यांकडून या वर्षीच्या कालवडी आणि वळूंसाठी आगाऊ नोंदणी पूर्ण झालीये (Success Story).
मार्केटमध्ये देशी गायींच्या दूध आणि तुपाला (Desi Cow Ghee) सर्वाधिक मागणी आहे. मात्र मागणीएवढा पुरवठा करणे शक्य होत नाही. बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन त्यांनी दूधविक्रीसह तूपनिर्मितीवर भर दिलाय. त्यांनी स्वतः दूध आणि तुपाला स्थानिक भागात मार्केट तयार केलं. सध्याच्या काळात दररोज 15 लिटर दूध जमा होते. हे दूध मोहोळ शहरातील ग्राहकांना 80 रुपये प्रतिलिटर दराने विकले जाते. दरमहा 3 ते 5 किलो तूपनिर्मिती केली जाते. तुपाला प्रतिकिलो 3 हजार रुपयांचा भाव मिळतो (Success Story).
त्यांच्या गोठ्यातील खिल्लार वळूंचा उपयोग रेतनासाठी होतो. परिसरातील शेतकरी खिल्लार गायी (Khillar Cow) रेतनासाठी त्यांच्या गोठ्यात घेऊन येतात. एका गायीच्या रेतनासाठी 1100 रुपये दर आहे. महिन्याकाठी व्यवस्थापन खर्च वजा करून खिल्लार गोवंश संगोपनातून शशिकांत यांना 1 लाख ते दीड लाख रुपयांचं उत्पन्न (Success Story) मिळते.
व्यवसायाला मेहनत आणि मार्केटिंगची साथ दिल्यास कोणताही व्यवसाय यशस्वी करता येतो याचे उत्तम उदाहरण शशिकांत यांनी इतर शेतकऱ्यांपुढे ठेवले आहे.