हॅलो कृषी ऑनलाईन: भारतीय हवामान विभाग (IMD) ने गुरूवारी (Monsoon Prediction) ऑगस्टमध्ये सामान्य पावसाचा अंदाज वर्तवला, परंतु ऑगस्ट-सप्टेंबर (August-September Monsoon) या कालावधीत ‘सामान्यपेक्षा जास्त’ पर्जन्यमानाचा अंदाज देखील वर्तवला आहे. मॉन्सूनच्या शेवटच्या महिन्यात जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे खरीप पिकांसाठी (Kharif Crop) धोका निर्माण होऊ शकतो. कापणीसाठी तयार असलेल्या खरीप पिकांना जोखमीचा सामना करावा लागू शकतो.
जुलैमधील वास्तविक पाऊस आणि मॉन्सूनच्या (Monsoon Prediction) दुसर्या सहामाहीत होणार्या संभाव्य पर्जन्य वृष्टीबद्दल प्रसारमाध्यमांना संबोधित करताना, आयएमडीचे महासंचालक एम महापात्रा यांनी सांगितले की, ऑगस्ट-सप्टेंबर 2024 दरम्यान संपूर्ण देशात पाऊस सामान्यपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे (दीर्घ कालावधीच्या सरासरीपेक्षा 106 टक्के जास्त). ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीसाठी दीर्घ कालावधीची सरासरी (LPA) 422.8 मिमी आहे (Monsoon Prediction).
काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस
पूर्व भारतातील ईशान्य आणि लगतचे अनेक भाग, लडाख, सौराष्ट्र आणि कच्छ आणि मध्य आणि द्वीपकल्पही प्रदेशातील काही वेगळ्या भागात “सामान्यपेक्षा कमी” (एलपीएच्या 94 टक्क्यांपेक्षा कमी) पाऊस पडू शकतो (Monsoon Prediction).
IMD ने या महिन्यासाठी स्वतंत्र अंदाज जारी केला आहे की संपूर्ण देशात पाऊस “सामान्य” असेल (LPA च्या 94 ते 106 टक्के) फक्त मध्य आणि लगतच्या उत्तर द्वीपकल्पही भारतातील अनेक भाग, उत्तर-पूर्व आणि पूर्व भारताच्या लगतचा भाग, उत्तर-पश्चिम आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतातील काही भाग वगळता सामान्य पावसाची स्थिती असेल. सप्टेंबरमध्ये ऑगस्टच्या तुलनेत जास्त पावसाची (Heavy Rainfall) शक्यता आहे
संपूर्ण भारतामध्ये जून-जुलै दरम्यान 453.8 मिमी पाऊस पडला, जो या कालावधीसाठी सामान्य मानल्या गेलेल्या 445.8 मिमी वरून 1.8 टक्क्यांनी वाढला.
मध्य भारतीय हवामानशास्त्रीय उपविभाग, जो शेतीसाठी मॉन्सूनच्या पावसावर जास्त अवलंबून आहे तेथे सलग तिसर्या मॉन्सून हंगामात चांगला पाऊस पडत आहे, ज्यामुळे कापूस, सोयाबीन आणि कडधान्य पिकांना विशेषतः मदत होण्याची शक्यता आहे. काही तज्ज्ञांच्या सांगण्यांनुसार मध्य प्रदेशात पूर्वी सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस (More Than Average Rainfall) झाल्याने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते.
हरियाणा आणि पंजाबमध्ये पावसाची मोठी तूट असली तरी, पावसाचा सध्याचा टप्पा पाहता खरीप पिकांना कोणताही धोका नाही कारण ही राज्ये जास्त सिंचनावर आधारित आहेत.
आयएमडी प्रमुख यांनी सांगितले की ऑरेन्ज अलर्ट (Orange Alert) म्हणजे कृतीसाठी तयार राहा आणि लाल इशार्याची वाट पाहू नये. त्याप्रमाणे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसाठी इशारे देण्यात आले आहेत.
केरळमधील वायनाड जिल्ह्यात 30 जुलै रोजी भूस्खलन होऊन 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी सांगितले की, केरळ सरकारने अतिवृष्टीमुळे वायनाडमध्ये संभाव्य नैसर्गिक आपत्तिबाबत केंद्राच्या इशार्याकडे लक्ष दिले नाही.