हॅलो कृषी ऑनलाईन: कपाशीला फुले,बोंडे लागण्याच्या अवस्थेत (Cotton Crop Protection) गुलाबी बोंड अळीचा (Pink Bollworm) प्रादुर्भाव आढळून येतो. सध्याचे ढगाळ वातावरण व सतत रिमझिम पडणारा पाऊस यामुळे गुलाबी बोंडअळीचे पतंग सक्रिय झालेले आढळून येत आहे (Cotton Crop Protection) .
बोंडअळीची मादी पतंग पाते, फुले, बोंडे यावर अंडी घालतात, तसेच कपाशी पिकाची लागवड एकाच वेळी न होता टप्याटप्याने झालेली असल्यास, किडीला सतत खाद्य उपलब्ध होत असते. असल्याने गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. ही गुलाबी बोंडअळी बोंडात शिरून नुकसान करते. ही बोंडे बाहेरून चांगली दिसत असली तरी ती परिपक्व न होताच उमलतात. यालाच डोमकळी (Domkali) असेही म्हणतात. यामुळे कपाशीची प्रत बिघडते (Cotton Crop Protection) .
या डोमकळीच्या प्रादुर्भावास कारणीभूत असणार्या बोंडअळीचे नियंत्रण कसे करावे व डोळकळीचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीच्या (VNMKV Parbhani) तज्ज्ञांनी (Agriculture Expert Advice) काही शिफारशी आणि सल्ला (Cotton Crop Advisory) दिलेला आहे (Cotton Crop Protection). जाणून घेऊ या सविस्तर.
एकात्मिक व्यवस्थापन (Cotton Crop Protection)
- कपाशीच्या पिकात (Cotton Crop) नियमित सर्वेक्षण करून डोमकळ्या दिसून आल्यास त्या आतील अळीसह तोडून जमा करून जाळून अथवा जमिनीत पुरून नष्ट कराव्यात. यामुळे सुरुवातीच्याच टप्प्यांमध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव हा कमी राहून पुढील नुकसान टाळता येईल.
- गुलाबी बोंडअळीसाठी कामगंध सापळे (Pheromone Trap In Cotton) हेक्टरी 5 या प्रमाणात पिकापेक्षा एक ते दीड फूट उंचीवर लावावीत़. याद्वारा गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाची निरीक्षणे नोंदविता येतील.
- मोठ्या प्रमाणात पतंग जमा करून नष्ट करण्यासाठी एका एकर क्षेत्रामध्ये गुलाबी बोंडअळीचे 8 ते 10 कामगंध सापळे लावावेत (Cotton Crop Protection) .
- ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी गांधीलमाशी ने परोपजीवीग्रस्त झालेले ट्रायकोकार्ड (Trichocards) प्रति एकरी 2-3 ( 60,000 अंडी) या प्रमाणात पीक 60 दिवसांचे झाल्यावर दोन वेळा लावावे. ट्रायकोकार्ड शेतामध्ये लावल्यानंतर कमीत कमी 10 दिवस पूर्वी व 10 दिवस नंतर रासायनिक कीटकनाशकाची फवारणी टाळावी.
- कपाशीचे शेतात पक्षांना बसण्यासाठी हेक्टरी किमान 25 पक्षी थांबे लावावेत, म्हणजे पक्षी त्यावर बसून शेतातील अळ्या खाऊन नष्ट करतील (Cotton Crop Protection) .
- 5 टक्के निंबोळी अर्क किंवा अॅझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 500 मिली (25 मिली प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा बिव्हेरिया बॅसियाना या बुरशीयुक्त जैविक कीटकनाशकाची जमिनीत ओल व हवेत आर्द्रता असताना 800 ग्रॅम (40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) प्रति एकर याप्रमाणात फवारणी करावी
आर्थिक नुकसानीची पातळीनुसार उपाय
कामगंध सापळ्यामध्ये सलग तीन दिवस 8 ते 10 पतंग प्रति सापळा किंवा 1 अळी प्रति 10 फुले किंवा 10 बोंडे किंवा 10 टक्के प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या किंवा बोंडे दिसून आल्यास खालीलपैकी एका रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी (Cotton Crop Protection) .
फवारणीसाठी रासायनिक कीटकनाशके (Insecticide Spraying In Cotton)
- प्रोफेनोफॉस 50 टक्के 400 मिली (20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात ) प्रति एकर किंवा
- इमामेक्टिन बेंझोएट 5 टक्के 88 ग्रॅम (4.4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) प्रति एकर किंवा
- इंडाक्झाकार्ब 14.5 टक्के 200 मिली (10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात) प्रति एकर किंवा
- क्लोरपायरीफॉस 20 टक्के 500 मिली (25 मिली प्रति 10 लिटर पाण्यात) प्रति एकर आलटून पालटून फवारावे.
फवारणी करताना घ्यायची विशेष काळजी
- वरील कीटकनाशका सोबत कुठल्याही प्रकारचे इतर कीटकनाशके, बुरशीनाशके, विद्राव्य खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये अथवा रसायने मिसळू नये.
- एकच एक कीटकनाशक फवारू नये, आलटून पालटून फवारावे.
- फवारणी करिता दूषित पाणी न वापरता स्वच्छ पाणी वापरावे आणि पाण्याचे प्रमाण शिफारसीनुसारच वापरावे, कमी पाणी वापरल्यास फवारणीचे अपेक्षित परिणाम दिसून येत नाही.
- किडनाशके फवारणी करताना योग्य ती संरक्षक विषयी काळजी घ्यावी.
अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राशी दूरध्वनी क्रमांक 02452 – 229000 किंवा व्हाट्सॲप क्रमांक 8329432097 यावर संपर्क करावा.