Farmers Success Story: कापूस, सोयाबीन आणि कांद्याच्या शाश्वत शेतीतून वार्षिक 30-40 लाख कमावणारा शेतकरी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: मराठवाडा (Farmers Success Story) हा नेहमीच कमी पावसाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. परंतु पाणीटंचाई असणाऱ्या या भागात एका प्रगतशील शेतकऱ्याने कापूस, सोयाबीन आणि कांदा या पिकांच्या शाश्वत शेतीतून एक यशस्वी शेती उद्योग उभारला आहे. यातून ते वार्षिक 40 लाख उत्पन्न कमावत तर आहेच शिवाय इतर शेतकरी आणि त्यांच्या समुदायासाठी एक आदर्श मार्गदर्शक सुद्धा आहेत.

जालना (Jalna Farmer) जिल्ह्यातील शिवनी येथे राहणाऱ्या या शेतकऱ्याचे (Farmers Success Story) नाव आहे उद्धव आसाराम खेडेकर (Uddhav Asaram Khedekar).

64 वर्षीय उद्धव खेडेकर हे गणितात पदवीधर आहेत, पण सुरुवातीपासूनच त्यांचा ओढा शेतीकडे होता. त्यामुळे पुढे अभ्यासाच्या क्षेत्रात करिअर करण्याऐवजी, त्यांनी शेती करायचे ठरविले. गेल्या 40 वर्षांत उद्धव खेडेकर हे कापूस (Cotton Crop), सोयाबीन आणि कांदा पिकाचे (Soybean And Onion Crop) तज्ज्ञ शेतकरी झाले आहेत. त्यांच्या या कष्टाचे फळ म्हणजे 2023 मध्ये, त्यांनी राज्य स्तरावरील भारतीय करोडपती शेतकरी पुरस्कार जिंकला (Farmers Success Story).

कोरडवाहू भागासाठी कापूस पिकाची निवड

दरवर्षी केवळ 500-550 मिमी पाऊस पडणाऱ्या खेडेकर यांच्या गावात पाणीटंचाई हे नेहमीचे आव्हान होते. कापसाला इतर पिकांच्या तुलनेत कमी पाणी लागते हे समजून उद्धव यांनी त्यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. आता ते त्यांच्या 15-20 एकर जमिनीवर सोयाबीन आणि कांद्यासोबत कापूस पिकवतात (Farmers Success Story).

शाश्वत शेती पद्धती (Sustainable Farming Method)

खेडेकर हे शाश्वत शेतीसाठी कटिबद्ध असून ते त्यांचे शेत निरोगी ठेवण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) आणि एकात्मिक पोषक व्यवस्थापन (INM) यांचा अवलंब करतात (Farmers Success Story). कीड नियंत्रण करण्यासाठी आणि मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी ते मुख्यतः सेंद्रिय पद्धतीचा वापर करतात. कीटक नियंत्रणासाठी, ते जैविक कीड नियंत्रण आणि चिकट सापळे यासारख्या नैसर्गिक पद्धतींवर अवलंबून आहेत. जेव्हा कीटकांची समस्या नैसर्गिकरित्या हाताळण्याच्या मर्यादेबाहेर जाते तेव्हाच ते शेतात रसायनांचा वापर करतात.  

पुरस्कारप्राप्त जलसंधारणाचे प्रयत्न (Farmers Success Story)

जलसंधारण (Water Conservation) या क्षेत्रातही खेडेकर यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. मर्यादित पाऊस आणि डोंगराळ भाग असूनही पाणी वाहून जात असे यावर खेडेकर यांनी पाणी वाचवण्याचे मार्ग शोधले आहेत. पाणी वाचवण्यासाठी त्यांनी गावात सिमेंट बंधारे बांधले आहेत आणि यातील पाण्याचा ते अंदाजपत्रकानुसार वापर करतात. यामुळे किती पाणी उपलब्ध आहे आणि ते सुज्ञपणे कसे वापरायचे याची गणित करण्यात त्यांना मदत होते. या कार्यामुळे त्यांचे गाव इतरांसाठी एक आदर्श गाव आहे.

या क्षेत्रातील त्यांच्या प्रयत्नांमुळे ICAR-‘बाबू जगजीवन राम इनोव्हेटिव्ह फार्मर अवॉर्ड फॉर वॉटर कॉन्झर्वेशन’ आणि एन.जी. वैविध्यपूर्ण शेतीसाठी ‘रंगा शेतकरी पुरस्कार’ या दोन राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे (Farmers Success Story).

2003 पासून सौर उर्जेचा वापर

सरकार सध्या सौर उर्जेचा (Solar Power In Agriculture) वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करत आहेत, यासाठी वेगवेगळ्या योजना सुद्धा आहेत. परंतु खेडेकर यांनी 2003 च्या सुरुवातीपासूनच त्यांच्या शेतात सौर उर्जेचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. यातून त्यांनी विजेच्या खर्चात कपात तर केलीच शिवाय त्यांचे शेत पर्यावरणास अधिक अनुकूल केले.

कापूस, सोयाबीन आणि कांदा – फायदेशीर पिके

खेडेकर यांना मिळालेले यश हे केवळ कापूस पिकातूनच आले असे नाही तर ते सोयाबीन आणि कांदा देखील पिकवतात आणि यातून त्यांना वर्षाला 30-40 लाख रुपये उत्पन्न मिळतात. फक्त कापूस पिकातून ते दरवर्षी सुमारे 150 क्विंटल उत्पादन घेतात ज्यातून त्यांना सुमारे रु. 10 लाख उत्पन्न मिळते. ते “एक गाव, एक वाण” या दृष्टिकोनाचा वापर करून स्थानिक पातळीवर आपला कापूस विकतात आणि NHH44 सारख्या कापसाच्या वाणांची लागवड करतात.

ते कर्नाटक, मध्य प्रदेश आणि बिहार सारख्या राज्यांमध्ये कांदा विकतात, ज्यामुळे त्याचे उत्पन्न आणखी वाढते.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर

यश मिळूनही खेडेकर नम्र आणि इतरांना मदत करण्यास सदैव तत्पर आहेत. ते सहकारी शेतकऱ्यांना 24/7 सल्ला देतात आणि केशवराज ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे ​​सदस्य आहेत. ते म्हणतात आपल्याला कितीही माहिती असली तरीही, शिकण्यासारखे नेहमीच असते.

खेडेकर केवळ स्वत:च्या यशासाठीच नव्हे तर आपल्या गावाच्या कल्याणासाठीही प्रयत्नशील आहेत. स्वच्छता अभियान (स्वच्छ भारत अभियान) मधील त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यांच्या गावाला स्वच्छतेच्या बाबतीत ओळख मिळाली आहे. त्यांनी स्थानिक प्रकल्पांसाठी 32% निधीचे योगदान दिले, उर्वरित 62% कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीतून आले.

खेडेकर हे आजच्या तरुणांना शेती करण्यास प्रोत्साहन देतात. शेतीमध्ये भरपूर क्षमता आहे. जर तरुणांनी शिकण्याची आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी दर्शवली तर त्यांना शेतीमध्ये यश मिळू शकते असे ते म्हणतात (Farmers Success Story).

शेती ही नोकरीपेक्षा जास्त चांगली आहे; हा आयुष्यभर शिकण्याचा अनुभव आहे. मी जिवंत असेपर्यंत या भूमीचा विद्यार्थी असल्याचा मला अभिमान आहे असे ते अभिमानाने सांगतात.