शेतकऱ्यांनो जाणून घ्या ! राज्यातील कोणत्या भागात कशी असेल पावसाची स्थिती

rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात २५ जुलै ते १ जून या कालावधीत कोकण, घाटमाथा ,उत्तर मध्य महाराष्ट्र जिल्ह्यात पाऊस सरासरीपेक्षा कमीच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली ,मरठवाड़ा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे तर दोन ते आठ जुलै दरम्यान विदर्भासह मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक आणि उर्वरित महाराष्ट्रात सरासरी ते सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सध्या जोरदार पावसासाठी पोषक स्थिती नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी हलका पाऊस होत असला तरी काही ठिकाणी मध्यम पाऊस पडत आहे. राज्यात नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून दाखल झाल्यानंतर कोकण विदर्भात चांगला पाऊस झाला. मात्र राज्याच्या विविध भागात कमी-अधिक स्वरूपात पाऊस पडला येत्या आठवडाभरात राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होणार असून उत्तर महाराष्ट्र वगळता उर्वरित महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता आहे. कोकण आणि राज्याच्या उत्तर भागात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहील.

शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कोकणातील डहाणू इथं 32.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. या दोन आठवड्यातील कमाल आणि किमान तापमानाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यात आठवडाभर कोकणच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीपेक्षा अधिक मध्य महाराष्ट्रात सरासरीइतका तर उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. तर राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमान सरासरी इतका राहण्याची शक्यता आहे.3 जून रोजी केरळमध्ये दाखल झाल्यानंतर काही दिवसातच देशाच्या बहुतांशी भागात मान्सून पोहोचला मात्र पुरेशा अनुकूल वातावरण या स्थिती अभावी राजधानी दिल्लीसह वायव्य भारतात मान्सूनची वाटचाल थांबली आहे. या भागात मान्सून दाखल होण्यासाठी आणखी वाट पहावी लागणार आहे.

शनिवारी भंडारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया येथे जोरदार पाऊस होईल. रविवारी अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ वाशीम येथे पाऊस होईल सोमवारी गडचिरोली, गोंदिया तर मंगळवारी गडचिरोली आणि गोंदिया इथं पाऊस होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे