शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ! आजपासून पावसाचा कमबॅक ,पहा कधी कोठे बरसणार

Unseasonal Rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : जून महिन्याच्या सुरुवातीला राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली त्यानंतर मात्र पाऊस काही गायबच झाला आहे. मात्र पाऊस येईल या अपेक्षेने काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. पण पावसाने दडी दिल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. हवामान खात्याने आजपासून पुन्हा पाऊस कमबॅक करेल अशी माहिती दिली आहे. आज पासून मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि विदर्भात काही ठिकाणी मोसमी पाऊस सक्रिय होणार आहे. तर दहा जुलै पासून राज्यात सर्वत्रच मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे दुबार पेरणीचं संकट तरी आता राज्यातील शेतकऱ्यांवरून टाळले असल्याचे म्हणता येईल…

अरबी समुद्रात सध्या मोसमी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. तर बंगालच्या उपसागरातून कमी उंचीवरून जमिनीच्या दिशेनं बाष्प येत आहेत त्यामुळे कोकण किनारपट्टीवर आज आणि उद्या मुसळधार पाऊस पाहायला मिळेल. तर विदर्भ मराठवाडा मध्य भारतात नऊ जुलै पासून पाऊस सुरू होणार आहे. तसाच 11 जुलैला अनेक ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. त्यामुळे पावसाचा जोर आणखी वाढेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविला गेला आहे.

‘या’ भागात पाऊस

याबरोबरच राज्यातील मुंबई सह ठाणे, कोकण विभाग, पुणे, कोल्हापुर, सातारा, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील नागपूर, वर्धा आणि मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.