PM Kisan च्या 9 व्या हप्ताची प्रतीक्षा करताय? चेक करा लाभार्थी आणि नाकारलेल्यांची Updated यादी

PM Kisan Yojana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात २००० जमा होणार आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा ८ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे. आता PM KISAN योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतीक्षा आहे ती या योजनेच्या ९व्या हप्त्याची. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेचा ९वा हप्ता येत्या ऑगस्ट महिन्यात जमा केला जाणार आहे.

PM Kisan Samman Nidhi Yojana पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने अंतर्गत केंद्र सरकार कडून योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना ६००० रुपयांची रक्कम खात्यामध्ये जमा केली जाते. २००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. २०१९ सालापासून ही योजना राबवण्यात येत आहे तेव्हापासून अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होत आहे. विशेषतः कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात या योजनेचे अनुदान शेतकऱ्यांना दिलासा देत आहे. त्यामुळेच लाखो शेतकऱ्यांना या योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा असते.

तुम्हाला पंतप्रधान किसानचा 9 वा हप्ता मिळेल की नाही ते जाणून घ्या

आपण जर या योजनेचे लाभार्थी असाल तर आपल्याला योजनेचा पुढील 2 हजार रुपयांचा हप्ता मिळेल की नाही हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

–पंतप्रधान किसन – pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जा.
–आता शेतकरी कॉर्नरमधील ‘Beneficiary Status’ वर क्लिक करा.
–एक नवीन पृष्ठ स्क्रीनवर उघडेल.
–या पृष्ठावरील, आधार क्रमांक, मोबाइल नंबर किंवा खाते क्रमांक – कोणताही एक पर्याय निवडा.
–‘Get Data’वर क्लिक करा.
–संपूर्ण अर्जाची स्थिती दिसून येईल – नाव, मोबाइल नंबर, आधार क्रमांक, राज्य, जिल्हा, गाव, खाते क्रमांक, नोंदणीची तारीख आणि नोंदणी क्रमांक इ.
–पुढे तुम्हाला Active and In Active असा पर्याय मिळेल . जर या स्तंभात Active लिहिले असेल तर याचा अर्थ असा की आपले पंतप्रधान किसान खाते सक्रिय आहे. आणि आपल्याला या योजनेंतर्गत 9 वा हप्ता मिळेल.

पंतप्रधान किसान योजनेत नाकारलेल्या शेतकऱ्यांच्या यादीची तपासणी कशी करावी?

–मुख्य पृष्ठावर, dashboard पर्याय आहे – फक्त त्यावर क्लिक करा.
–राज्य, जिल्हा, गाव आणि उपजिल्हा निवडा
–नंतर show बटणावर क्लिक करा.
–तेथे तुम्हाला पंतप्रधान किसान योजनेत नाकारलेल्या शेतकऱ्यांची यादी दिसेल.