जैविक शेतीसाठी संजीवनी आहे ‘मृदा अमृत’, जाणून घ्या तयार करण्याची पद्धत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मृदा अमृत हे आपल्या जमिनी साठी खूप महत्त्वाचे आणि जमिनीची ताकद वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते यामध्ये कोणताही खर्च शेतकऱ्यांना येत नाही. पिके सशक्त राहतात. जर जमीन चांगल्या प्रतीची म्हणजेच सुपीक असली तर च पिके चांगले येतील त्यासाठी मृदा अमृत हे प्रत्येक शेतकऱ्यांनी बनवली पाहिजे. विशेष म्हणजे जैविक शेती करीत असताना मृदा अमृत हे पिकांसाठी खूप फायदेशीर ठरते. आजच्या लेखात मृदा अमृत कसे बनवावे याची माहिती करून घेऊया…

साहित्य

–जमीनीच्या पृष्ठभागावरील २ इंचापर्यंतची १५ किलो माती.जमीनीच्या पृष्ठभागाखालील १ ते ४ फुट खोलीवरील १५ किलो माती. ( ही माती शक्यतो कडक उन्हाळ्याच्या काळात खणून काढावी)
–दोन्ही प्रकारची माती उन्हात वाळवून घ्यावी. त्यामधे आर्द्रता अजिबात शिल्लक नाही याची खातरजमा करावी.
–माती आपल्याच शेतातील असावी २०० लिटर पाण्यासाठी हे प्रमाण आहे.
–आपल्या गरजेनुसार सर्वच साहित्य प्रमाणबद्ध कमी/जास्त करावे.

कृती
–दोन्ही माती २०० लिटरच्या ड्रम मधे टाकून तो पाण्याने पूर्ण भरावा.
–माती पाण्यात व्यवस्थित विरघळेल इतपत पाणी काठीने ढवळावे.
–यानंतर पाणी स्थिर होऊ द्यावे.
— ३० मिनीटांमधे मातीतील तरंगणारे घटक पाण्याच्या तळाशी बसतील.
–वरच्या थरातीळ गढूळ पाणी कापडाने अथवा गाळणीने गाळून घ्यावे.

कसे वापरावे

–गाळलेले पाणी लगेचच अथवा चार तासांच्या आत पिकावर उपलब्ध साधनांच्या मदतीने फवारावे.
–फवारणीसाठी साधन उपलब्ध नसल्यास हाताने शिंपडावे. (२०० लिटरच्या ड्रममधे बनविलेल्या पाण्यापासून वरच्या थरातील अंदाजे १६० लिटर पाणी फवारणीसाठी उपलब्ध होते) अशा प्रकारे पिकास फवारणी दर ७ ते १० दिवसांच्या अंतराने करावी.
–भाजीपाला पिकास फुलधारणेच्या अवस्थेत अथवा कापणीच्या काळात ही फवारणी दर ४ दिवसांनी करावी.
उरलेला गाळ झाडांना अथवा पिकास जमीनीद्वारे द्यावा.
–खोल जमीनीत जिथपर्यंत पिकांचि मुळे जात नाहीत अशा मातीत अन्नद्रव्ये अधिक प्रमाणात असतात.
–जसजसे खोल जावे तसतसे हे प्रमाण वाढत जाते.
–जमीनीच्या पृष्ठभागावरील मातीत वायवीय (aerobic) व अवायवीय (anaerobic) सूक्ष्मजीवांचे प्रमाण अधिक असते.
–या जिवाणूंच्या मदतीने पाण्याच्या संपर्कात खोल मातीतील अन्नद्रव्ये पाण्यात विरघळली जातात व पिकास सहजगत्या उपलब्ध होतात.

फायदे

–या पद्धतीने पिकास जमिनीतून दिल्या जाणाऱ्या निविष्ठांच्या तुलनेत अत्यल्प प्रमाणात मातीचा वापर करून थेट व त्वरित अन्नद्रव्ये पुरविली जातात.
–झाडांची व पिकाची वाढ मजबूत होते.
–फळे व धान्याच्या उत्पादनात वाढ होते.
–पिकास रोगराई व किडिंचा उपद्रव होत नाही.
–उत्पादित फळे व धान्याचा दर्जा, चव व पोषक तत्वे यामधे लक्षणीय वाढ दिसून येते.
–यापकारे पिकवलेल्या भात व गहू या पिकामधे विटॅमिन A व C ची मात्रा अधिक आहे.

महत्वाचे

–हिवाळ्यात किंवा थंड प्रदेशात जेंव्हा दिवसा तापमान ३० डिग्री सें. व रात्री २० डिग्री सें. इतके किंवा यापेक्षा कमी असते, अशा काळात हे मिश्रण तयार करताना त्यात २ किलो गायीचे ताजे शेण व २ ते ५ लिटर गोमूत्र मिसळल्यास उत्तम परीणाम मिळू शकतात.
–दोन्ही प्रकारच्या माती वाळवून साठवण करताना एखाद्या खोलीत अथवा ताडपत्रीने (टारपोलिन) झाकून वेगवेगळी ठेवावी. द्रावण तयार करण्या अगोदर पाणी अथवा आर्द्रतेचा संपर्क होऊ देऊ नये.