राज्यात ऊन सावल्यांचा खेळ ; मॉन्सूनचा मोर्चा उत्तरेकडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पावसासाठी पोषक हवामान नसल्याने राज्यात उन सावल्यांचा खेळ सुरू झाल्या काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण अजूनही कायम आहे. येत्या काही दिवसात ही स्थिती कायम राहणार आहे. आज दिनांक सात रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी शिडकावा तसेच उर्वरित राज्यात काही ठिकाणी हलक्‍या सरी पडणार असून हवामान मुख्यतः कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मान्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थिती वर आला आहे. बिकानेर जयपुर पासून कमी दाब क्षेत्राच्या केंद्रांमधून उत्तर मध्य प्रदेश व परिसर, उत्तर बंगालच्या उपसागरात पर्यंत सक्रिय असलेला मान्सूनचा आस उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. बांगलादेश आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून 5.8 किलो मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. मध्यप्रदेश आणि परिसरातही कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून त्याचे चक्रीय वाऱ्यामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून 5.8 किलो मीटर उंचीवर आहे.

राज्यात हलक्या सरी

सध्या मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात ऊन पडत असल्याने व कमाल तापमानाचा पारा काही प्रमाणात वाढला आहे. अनेक ठिकाणी सरासरीच्या तुलनेत कमाल तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअस दरम्यान वाढ झाली आहे. उद्या रविवारी कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे . उर्वरित राज्यात हलक्‍या सरांचा पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे