हॅलो कृषी ऑनलाईन : आज सकाळी नऊ वाजता निरीक्षण केले केलेल्या हवामान विभागाच्या मुंबई रडारवरून मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, कोकण, डहाणू इथं ढग दाटून आले आहेत. त्यामुळे इथं पाऊस जोरदार होण्याची शक्यता आहे. नाशिक, ठाणे, कल्याण या विभागांच्या घाट माथ्यावर काही भागात ढग साचले आहेत त्यामुळे या भगत देखील पावसाची शक्यता आहे. याबाबतची माहिती हवामान विभागाचे तज्ञ के. स. होसाळीकर यांनी दिली आहे. दरम्यान मागच्या 24 तासात राज्यातल्या काही भागात मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे. यात कल्याण, डोंबिवली, भिवंडी, ठाणे मुंबईचा काही भाग यांचा समावेश आहे.
19/8, Mumbai Thane NM rainfall in last 24 hrs at 8.30 am today morning.
As per the forecast yesterday, isol heavy rains observed in these areas with few intense spells especially during yesterday day time.
Night the rains remained light.
CLB 52.4 MM
SCZ 42.5 MM@RMC_Mumbai pic.twitter.com/AvsdcmEXDK— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 19, 2021
दरम्यान महाराष्ट्रात आज काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्यावतीनं हा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पाऊस पडतोय. उत्तर कोकणात ठाणे , पालघर आणि मुंबई मध्ये मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्या शुभांगी भुते यांनी वर्तवला आहे.
महाराष्ट्र आज आणि उद्या क्काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे . अधिक माहितीसाठी प्रादेशिक हवामान विभाग्याच्या संकेतस्थळाला भेट ध्या . https://t.co/JYmdPo98tJ pic.twitter.com/KsedXFmeBP
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 18, 2021
राज्यात कुठे पाऊस पडणार?
आयएमडीच्या वतीनं आज महाराष्ट्र, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिली आहे. तर, आजच्य दिवसासाठी यवतमाळ जिल्ह्याला ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, बुलडाणा, वाशिम, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.