राज्यात आजही मुसळधार पावसाचा अंदाज, उत्तर महाराष्ट्रात यलो तर विदर्भात ऑरेंज अलर्ट

Heavy Rainfall
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील अनेक दिवसांपासून राज्यात ओढ दिलेल्या पावसाने दमदार कमबॅक केला आहे. मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आहे. दरम्यान आजही राज्यातल्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या वतीने उत्तर महाराष्ट्रात यलो तर विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

कमी दाबाचा पट्टा सक्रिय

झारखंड आणि परिसरात ते दक्षिण गुजरात, छत्तीसगड, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून तीन पॉईंट एक किलोमीटर आणि 4.5 किलो मीटर दरम्यान आहे विदर्भापासून तमिळनाडू पर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा गंगानगर पासून बंगालच्या उपसागरात पर्यंत सक्रिय आहे दक्षिण छत्तीसगड आणि विदर्भाच्या क्रिया वाऱ्याची स्थिती असून ती समुद्रसपाटीपासून 4.5 किलो मीटर उंचीवर आहे. तसेच दक्षिण महाराष्ट्राची किनारपट्टी ते केरळ किनारपट्टी दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यंदा पावसाची सर्वाधिक ओढ असलेल्या उत्तर महाराष्ट्रातही पाऊस पडला.

शनिवारपर्यंत पावसाचा जोर

शनिवारपर्यंत राज्यात पावसाचा जोर राहणार आहे म्हणजेच आणखी दोन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. उत्तम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पावसाने पिकांना जीवदान मिळालं आहे. धुळे नंदूरबार, नाशिक जिल्ह्यांतही जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद, नांदेड उस्माबादसह विदर्भातील जिल्ह्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाचा जोर आणखी दोन दिवस राहिल, त्यानंतर पाऊस कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.राज्यातील मुंबई, ठाणे, धुळे, नंदूरबार, जळगाव या भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे तर विदर्भात, नाशिक, पालघर, ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

20 ऑगस्ट

20 ऑगस्टला अमरावती आणि नागपूरला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आलाय. विदर्भातील इतर जिल्ह्यांतही पावसाचा अंदाज आहे. तर, उर्वरित महाराष्ट्रात ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.