हॅलो कृषी ऑनलाईन : आपण ऐकून असाल की, बाजारात अनेक प्रकारच्या मस्टर्ड आणि रिफायन तेलाची उत्पादने आली आहेत. बाजारात तेलाची मागणी वाढली त्याचप्रमाणे तेलांचे पर्यायही वाढले आहेत. पण याचबरोबर तेलाचे दरही वाढताना आपल्याला दिसत आहेत. अशात आपणच ऑईल सुरू करण्याचा विचार केला तर ? हो आपणही सुरू करू शकता ऑईल मिल, विशेष म्हणजे याचा खर्चही इतर व्यवसाया इतकाच आहे. सध्या तेल बियाणांपासून तेल काढण्याचा व्यवसाय खूप यशस्वी होताना दिसत आहे. जर आपल्याला व्यवसायातून अधिकचा नफा कमावयचा असेल तर या व्यवसायाविषयी आपण विचार करावा. जर तुम्ही स्वत शेतकरी असाल तर तुम्हाला तेल बिया आपल्याच शेतात मिळतील. जर तुम्ही सुर्यफूल आणि मोहरीचे उत्पन्न घेत आहात तर ऑईल मिलसाठी तुम्हाला कच्चा माल आणण्याची गरज नाही.
ऑईल मिल काय आहे
ऑइल मिलमध्ये तुम्ही बिया बारीक करून त्यामधून तेल काढा. काढलेले तेल बाटलीत पॅक करून विक्री करा. परंतु, गिरणी सुरू करण्यापूर्वी, आपल्याला बर्याच प्रकारचे मशीन्स खरेदी करावी लागतील. आपल्याला नेमकं कोणत्या प्रकारचे ऑईल मिल सुरू करायची आहे, म्हणजे मोहरी तेल, ऑलिव्ह ऑईल, तीळ तेल आदी. याचा हे आधी निश्चित करा. ऑईल मिलचे प्रकार – भारतात स्वयंपाक करण्यासाठी अनेक प्रकारची तेले वापरली जातात आणि ती अशीःमोहरीचे तेल, ऑलिव तेल, रिफायन ऑईल, तीळाचे तेल.आपण तिन्ही प्रकारात हा व्यवसाय सुरू करू शकता. साधरण, मध्यम, किंवा मोठ्या प्रमाणावर म्हणजे अधिक भांडवल लावूनही तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.
लहान पातळीवरील उद्योग – ५ ते १२० मेट्रिक टन ऑईल तेल दर दिवसाला काढण्यात येते.
मध्यम पातळीवरील उद्योग – १० ते १५ मेट्रिक टन तेलाच उत्पादन एका दिवसात होत असते.
मोठ्या पातळीवरील उद्योग– यातून ५० मेट्रिक टन तेल दर दिवसाला उत्पादित करत असतो.
काय़ खर्च येतो मस्टर्ड मिलसाठी –
15KW/20 HP motor – साठी ४० हजार रुपये.
Oil extraction machine तेल काढण्याचे यंत्र- एक लाख रुपये
Empty tins and bottles रिकामे डबे आणि बाटल्या – किंमत १० हजार रुपये
Power connection ( 3 phase ) इलेक्ट्रिक पॉवर – २० हजार रुपये
कामगारांच्या वेतनाचा समावेश केला तर आपल्याला ऑईल मिलसाठी २ लाख रुपयांचा खर्च येईल.
तेलासाठी कच्चा माल
–मोहरी, सूर्यफूल इत्यादीसारखी स्वतःची झाडे लावून आपण बियाणे मिळवू शकता.
–तथापि, बियाणे स्वतःच वाढण्यास आपल्याला थोडा वेळ लागेल.
–तेलबिया तुम्ही कोणत्या दुकानदाराकडून किंवा शेतकऱ्यांकडूनही विकत घेऊ शकता.
–रिकामे डबे आणि बाटल्या.
ऑईल मिलसाठी लागणारी मशीनरी
–(Screw expeller) स्क्रु एक्सपेलर
–(Cooker and filter press with plunger pump and filter cloth). कूकर आणि फिल्टर प्रेसासह फिल्टर कापड आणि प्लगर पंप
–(Storage tank for oil) स्टोरेज टाकी
–Weighing scale ( Electronic ). इलेक्ट्रिनिक काटा
–(Sealing machine) सेलिंग मशीन पॅकिग करण्याचे मशीन
–(Box stamping). बॉक्स स्टॉम्पिग
आपण तेल काढण्याचा व्यवसाय करण्यासाठी पूर्णपणे स्वयंचलित मशीन वापरू शकता.किंवा आपण अर्ध-स्वयंचलित मशीनद्वारे तेल देखील काढू शकता.
कुठे खरेदी कराल मशिन्स
या मशीनच्या किंमती त्यांच्या गुणवत्तेनुसार निश्चित केल्या जातात. लिंक्स –
https://dir.indiamart.com/impcat/oil-extraction-machine.html
https://www.alibaba.com/showroom/oil-extraction-machine.html
परवाने व प्रमाणपत्र
हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आपल्याला बर्याच प्रकारचे परवाने व प्रमाणपत्र आवश्यक आहे. कारण परवाना व प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच आपण आपले तेल बाजारात विकू शकता. भारत सरकारतर्फे खाद्यपदार्थांशी संबंधित दोन प्रकारचे परवाने दिले जातात. एक परवाना भारतीय मानक ब्यूरोने दिलेला आहे तर दुसरा परवाना एफएसएसएआय ने दिला आहे. या व्यतिरिक्त आपण ज्या राज्यात हा व्यवसाय सुरू करीत आहात. त्या राज्यातील सरकारचा परवाना हवा असतो.
तेल काढण्याची प्रक्रिया
1) बियाणे निवड:-ज्या बियांपासून आपण तेल काढणार आहात त्या बिया चांगल्या गुणवत्तेच्या असाव्यात. आपण स्वत पिकावलेल्या असतील तर बियांची तपासणी करा. जेणेकरून फुटलेल्या बिया मशीनमध्ये जाणार नाहीत असे. जर आपण बिया शेतकऱ्यांकडून घेत असू तर त्या खराब नाहीत ना याची खात्री करा. कोरड्या आणि चांगल्या गुणवत्तेच्या बियांचा उपयोग तेल काढण्यासाठी होतो.
2) पूर्व-साफसफाई आणि सजावट -जेव्हा आपण शेतातून बियांची काढणी करतो तेव्हा बियाण्यामध्ये बरीच प्रकारच्या लहान गारगोटी, माती, धूळ आणि इतर गोष्टी देखील आढळतात. यामुळे बियांची सफाई किंवा स्वच्छ करणे आवश्यक आहे. नाहीतर बियांबरोबर माती, खडे मशीनमध्ये भरडले जातील. परिणामी तेलाची गुणवत्ता खराब होईल. तेल काढण्यापुर्वी बियां स्वच्छ करणे आवश्यक असते. दगड आणि माती काढून टाकल्यानंतर आपल्याला बियाण्यांमध्ये असलेला पेंढा देखील काढावा लागेल. आपण हे बियाणे हातांनी स्वच्छ करू शकता. मशीनच्या मदतीने ते स्वच्छ देखील करू शकता.
3) बियाणे कंडिशनिंगही – पायरी महत्त्वपूर्ण आहे कारण बियाण्यांचे कंडिशनिंग केल्याने जास्त तेल निघते आणि या प्रक्रियेत बियाणे रोलर्समध्ये ठेवले जातात. सूक्ष्म तेलाचे थेंब आणि रोलर्स एकत्रित होत असल्याने बियांच्या पेशी तेल शोषून घेतात. ज्यामुळे तेल बियाण्यांमधून सहज आणि काढले जाऊ शकते.
4)हीटिंग: -विविध जीवाणू काढून टाकण्यासाठी आपल्याला बियाणे गरम करावे लागेल. हे लक्षात ठेवावे की प्रत्येक बियाण्यासाठी वेगवेगळ्या ओलावाची परिस्थिती आणि तापमान आवश्यक असते.
5)तेल काढणे:-मशीनमध्ये बियाणे ठेवल्यानंतर त्यातील तेल काढले जाते. भरडल्या गेल्यानंतर त्यातून निघालेले तेल आपण टाकीमध्ये स्टोरेज करतो.
6) गाळणे :-काही प्रमाणात तेला अशुद्ध असते, म्हणजे माती किंवा इतर बियांचे टरपले तेलात असतात. त्यामुळे तेल गाळून घ्यावे लागते.
संदर्भ – दैनिक जागरण