कापसाच्या दरात तेजी कायम राहण्याची शक्यता ; जाणून घ्या कसे असते कापसाचे आर्थिक गणित

Cotton
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : जागतिक बाजारात 1994 व 2011 नंतर पहिल्यांदाच कापसात तेजी अनुभवली जात आहे. त्याच कारणामुळे ह्या वर्षी भारतात कापसाचे दर सात हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक राहण्याची शक्‍यता शेती प्रश्नाचे ज्येष्ठ अभ्यासक विजय जावंधिया यांनी वर्तवली आहे.

1994 साली जागतिक बाजारात एक पाउंड रुईचा दर एक डॉलर प्रति 10 सेंट प्रति पाउंड होता. 2011साली तो विक्रमी 12 डॉलर 14सेंट प्रति पौंडाच्या दरा पर्यंत पोहोचला. 1995 नंतर जागतिक बाजारात कापसाच्या दरात मंदी होती व ते 40सेंट प्रति पाउंड पर्यंत खाली घसरले होते. त्यामुळेच 1997 ते 2003 पर्यंत भारतात 110 लक्ष कापूस गाठींची आयात झाली होती. त्यानंतर हे दर 2019 पर्यंत 70 सेंट ते एक डॉलर प्रति पाउंड दरम्यान राहिले. 1994 आणि डॉलरचा विनिमय दर 33- 34 रुपये असा होता. म्हणून भारतात कापसाचे दर 2500 रुपये प्रति क्विंटल होते. 2011साली देखील एक डॉलर आणि रुपयाच्या विनिमय दरात जास्त अंतर नव्हतं. त्यावेळी विनिमय दर 55 रुपये होता. त्याच्या परिणामी देखील कापसात तेजी अनुभवण्यात आली. 6000 ते 7५०० रुपयांपर्यंत कापसाचे दर 2011 मध्ये पोहोचले होते.

याबाबत बोलताना विजय जावंधिया म्हणाले, कापसातील तेजी ही तीन कृषी कायद्यांच्या परिणामी आल्याचा भ्रम निर्माण केला जात आहे. मात्र तसं काहीही नसून जागतिक बाजारात कापसाची आवक कमी असल्याने दरातील ही तेजी आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन हेदेखील एक कारण त्यामध्ये आहे असे त्यांनी म्हटले आहे. ७००० क्विंटलपेक्षा अधिकचाच दर कापूस उत्पादकांना मिळेल असा दावा विजय जावंधिया यांनी केला आहे.

काय आहे गणित

— एक क्विंटल कापसापासून 34 किलो रुई व 64 किलो सरकी मिळते.

–एक डॉलर पंधरा सेंड एक पौंड रुईचा भाव (187 किलो रुई )

— 34 किलो रुईचे (187×34)=6363

— 64 किलो सरकीचे 30 रुपये प्रति किलोमागे 1920 रुपये.

–एक क्विंटल कापसाचे 6363 अधिक 1920 म्हणजेच 8250

— प्रक्रिया खर्च व्यापारी नफा १२50 रुपये वजा केले तर ७००० रुपये होतात.