…तर सोयाबीनलाही मिळेल चांगला दर, वाचा कृषीतज्ञांचा सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीपातील उडीद, मूग या पीकाची हमीभाव केंद्रावर खरेदी सुरु झाली आहे. आता सोयाबीनचीही ऑनलाईनद्वारे नोंदणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात सोयाबीनचीही खरेदी ही हमीभावाने होणार आहे. मात्र, हमीभाव केंद्रावर दर्जानुसार दर दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील माल थेट बाजारात न आणता त्यापुर्वी योग्य ती प्रक्रीया करणे आवश्यक आहे. नेमकी ती प्रक्रीया काय आहे ते आपण पाहणार आहोत…

विक्रीपूर्वी करा ‘ही’ प्रक्रिया

–सध्या सोयाबीनची काढणी अंतिम टप्प्यात आहे.
–पावसामुळे सोयाबीनचा दर्जा हा ढासाळलेला आहे.
–यातच दर कमी असल्याने डागाळलेल्या सोयाबीनची कवडीमोल दराने विक्री होत आहे.
–त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी झाली शेतीमालाची विक्री न करता सोयाबीनमधील आर्द्रतेचे प्रमाण कमी होण्यासाठी सोयाबीन ऊनामध्ये वाळवणे आवश्यक आहे.
–त्यामुळे सोयाबीनमधील आर्द्रता कमी होणार असून चांगला दर मिळणार आहे.
— सध्या पावसामुळे सोयाबीनच्या पीकावर परिणाम झाला असून शेतकऱ्यांनी योग्य दर पदरात पाडून घेण्यासाठी ही प्रक्रिया करणे महत्वाचे असल्याचे कृषी विभागाच्या वतीनेच सांगण्यात आलेले आहे.

म्हणून सोयाबीनला मिळत नाही योग्य दर

मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला योग्य दर मिळवून देण्यासाठी बाजार समिती बोर्डाचे व्यवस्थापकीय संचालक विकास नरवाल बाजार समित्यांच्या सचिवांनाच योग्य त्या सुचना देऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे सांगितले आहे. त्यामुळे सोयाबीनला चांगला दर मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी राज्यातील 259 बाजार समित्यांना याबाबत सुचना केल्या आहेत. आर्द्रतेचे प्रमाण 20 ते 22 टक्क्यांपर्यंत असल्याने योग्य दर मिळत नाहीत.

आर्द्रतेचे प्रमाण कसे मोजावे

यंदा सोयाबीन हे पाण्याच भिजल्याने नुकसान झाले आहे. हे पीक काळवंडले असून त्याचा दर्जाही ढासाळलेला आहे. त्यामुळे सोयाबीन वाळवून त्याच्यातील आर्द्रतेचे प्रमाण मोजणे आवश्यक आहे. हे प्रमाण मोजण्यासाठी बाजारात यंत्र मिळते. पावसात सोयाबीन भिजल्याने त्यामध्ये 22 ते 23 टक्के आर्द्रता म्हणजेच हवेचे प्रमाण. त्यामुळे सोयाबीनला दरही कमी मिळतो. ऊनात वाळवल्यानंतर त्याच्यातील आर्द्रता ही 10 ते 11 टक्क्यावर आली तर चांगला दर मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

हंगामाच्या सुरवातीला सोयाबीनचे दर हे 11 हजार रुपये क्विंटल होते. मात्र, सध्याची स्थिती बदलली आहे. सोयाबीन हे 5 हजार रुपये प्रमाणे विकले जात आहे. दर घसरले आहेत शिवाय मालाचा दर्जाही घसरलेला आहे. त्यामुळे योग्य मिळवण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. म्हणूनच विक्रीपूर्वी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी याबाबत कृषी विभागानेच मार्गदर्शन केले आहे.यंदा मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात सोयाबीनची विक्रमी लागवड झाली होती. त्यामुळे भरघोस उत्पादन होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, पावसाने तर नुकसान झालेच शिवाय सरकारचे धोरणही चुकले त्यामुळे अधिकचा फटका बसलेला आहे. सोयापेंडच्या आयातीचा निर्णय, तेलबियांच्या साठ्यावर निर्बंध यामुळे साोयाबीनचे दर अधिकचे घसरले आहेत. यातच सुधारणा करण्याच्या अनुशंगाने कृषी विभागाने केलेल्या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

संदर्भ – टीव्ही ९