विदर्भ,मराठवाड्यात पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ… अनेक ठिकाणी सोयाबीनचे नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार झाला आहे. मान्सून उत्तर पावसाचा मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, औरंगाबाद, विदर्भातील, बुलढाणा, वाशिम, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसल्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचल्याने खरिपातील पिकांचे नुकसान यात आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झालेत. अचानक आलेल्या पावसामुळे काढणी केलेला सोयाबीन पाण्यात वाहून गेल्याच्या घटना देखील राज्यात पुढे आल्या आहेत.

अनेकांचे सोयाबीन पाण्यात

राज्यातून परतीचा पाऊस परतला नाही. उन्हाचा चटका वाढला होता त्यामुळे उकाड्यात वाढ होऊन कमाल तापमानाचा पारा काही प्रमाणात वाढला होता. त्यातच शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू केली होती मात्र पावसासाठी पुन्हा वातावरण बदलाने शनिवारपासून पुन्हा पावसाने जोर धरला. सायंकाळी मराठवाड्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला. यामुळे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील कयाधू नदीला चांगलाच महापूर आला होता. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचा गंजी पुरात वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले असून काढण्यातही अडथळे निर्माण झाले आहेत परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला ना सोयाबीनची काढणी करणाऱ्या मजुरांची तारांबळ उडाली पावसामुळे अनेकांचं सोयाबीन भिजल्याने हाती आलेला घास हिरावला गेला आहे.

विदर्भात सर्वाधिक 164 मिलिमीटर पावसाची नोंद

अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली. काही ठिकाणी पावसाचा जोर कमी असला तरी अनेक ठिकाणी झालेल्या जोराच्या पावसामुळे कपाशी पिकात चांगलंच पाणी तुंबले होतं. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, बीड, जालना या सहा जिल्ह्यातील 27 मंडलामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. त्यापैकी दहा मांडलात 100 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. विदर्भातही बुलढाण्यातील 29 मंडळांमध्ये पुन्हा अतिवृष्टी झाली असून सर्वाधिक 164 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.