हॅलो कृषी ऑनलाईन : पिकांवर अनेक प्रकारच्या रोगांचा व किडींचा प्रादुर्भाव हा बदलत्या हवामानामुळे होत असतो. त्यामुळे त्यांचे वेळीच नियंत्रण करणे अत्यंत गरजेचे असते नाहीतर शेतकऱ्यांचे नुकसान होते. एखाद्या गोष्टीमुळे किंवा पिकांमुळे जर आपल्या पिकांवर कोणते कीड येणार आहे किंवा कोणते रोग येणार आहे त्यांचे संकेत आपल्याला मिळाले तर नक्कीच आपण त्या किडींवर व रोगांवर मात करू शकतो. या लेखात आपण अशाच कीड व रोगाचे संकेत देणाऱ्या इंडिकेटर्स क्रॉप म्हणजेच पिके यांची माहिती घेणार आहोत.
पिकांवर येणाऱ्या रोग आणि कीड यांचे संकेत देणारे पिके
१) मावा या किडीचा विचार केला तर ही कीड सगळ्यात आगोदर मोहरी, बडीशेप, करडई या पिकांवर येतो. या पिकांवर मावा ही कीड आले तर समजावे की यानंतर तो आपल्या शेतात असणाऱ्या पिकात येणार. दुसरे म्हणजे शेपूचाशेंडा जर पांढरा पडला तर समजावे आपल्या शेतात लावलेल्या पिकावर बुरशी येण्याचे हे संकेत आहेत.
२) जर पिकाच्या अवतीभोवती किंवा कांदा पिकाच्या सभोवती मक्याची सिंगल लाईन करून त्याचे कंपाउंड केले तर कांदा पिकावर थ्रिप्स कमी येतो. मका पिकाच्या पोंग्यात मित्र कीटक लवकर तयार होतात. मक्यावर पांढरा व पिवळा मावा लवकर आकर्षित होतो.तो कांद्यावर येत नाही.
३)शेतात झेंडूची झाडे अधिक प्रमाणात असले तर लाल कोळी हे किटक झेंडूला आधी खातो. तसेच झेंडूचे फूल पीक सूत्रकृमी लाही अटकाव करते. करडई हे पीक जर शेतात असले तर करडईच्या ज्या पानांवर मावा आला ती गोळा करायचे व मोठ्या भांड्यात पाणी, रॉकेल घेऊन त्यात पाने टाकायचे त्यामुळेमावा मरतो.
४) हिरवी मिरची व लसूण व त्यासोबतच गरज एवढी थोडे मीठ यांचे योग्य पद्धतीने व योग्य प्रमाणात द्रावण व काढा तयार करायचा. तोंडाला रुमाल बांधून फवारणी करायची त्यामुळे अळी चे नियंत्रण होते.
५) तुळस हे पीक फार महत्त्वाचे आहे. एका एकरात आठ तुळशीची झाडे लावली तर त्याच्या वासाने शत्रू कीटक पिका जवळ येत नाहीत.पिकाच्या आजूबाजूला रोग किडीचे प्रमाण असल्याचा अनुभव आहे. तसेच लिंबाचा पाला व गवरीची जाळून राखुंडीतयार करून ती पिकावर धुरळल्यास नाग अळी नियंत्रणात येते.
संदर्भ : कृषी जागरण