हॅलो कृषी ऑनलाईन : भारतात कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल घडून येत आहेत. ह्या बदलात आधुनिक तंत्रज्ञानाचा खुप मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. ह्या आधुनिक युगात शेती आणि शेतीसंबंधी व्यवसायात क्रांती घडून येत आहे अशीच एक क्रांती घडली आहे दुग्ध उद्योगात. मित्रांनो आता सोयाबीन पासुन दुध बनवता येणार आहे सोयाबीन पासुन बनवल्या जाणाऱ्या ह्या दुधाला सोया मिल्क म्हणुन ओळखले जाते हे सोया मिल्क पौष्टिक असल्याने ह्याची मागणी ही भारतात मोठया प्रमाणात वाढली आहे आणि हेच कारण आहे की आता बरेचसे शेतकरी उद्योजक ह्या व्यवसायातून लाखो रुपये कमवीत आहेत.त्यामुळे आम्ही आपणांस सोया मिल्क बनवण्याविषयीं माहिती सांगणार आहोत आणि त्या माहितीतून तुम्हीही सोया मिल्कचा प्लांट टाकून लाखों रुपयापर्यंत कमाई करू शकता. चला तर मग जाणुन घेऊया सोया मिल्कच्या बिजनेसविषयी
मित्रांनो सोया दूध म्हणजे सोयाबीनचा रस होय. सोया मिल्क तयार करण्यासाठी, सर्व्यात आधी चांगल्या प्रतीचे सोयाबीन (Soyabean) निवडावे लागते. मग निवडलेले चांगले सोयाबीनचे दाणे पाण्यात भिजवले जातात आणि पाण्यात भिजवलेले हे सोयाबीनचे दाणे दळले जातात आणि त्यामधून फायबर हे सोया दुधापासून वेगळे केले जातात.त्यानंतर सोया मिल्क उकळले जाते. यानंतर, त्याचे पॅकेजिंग केले जाते आणि बाजारात विक्री करण्यासाठी पाठवले जाते, ह्या पद्धतीने आपण देखील सोया मिल्कचे प्रॉडकशन करून चांगला नफा कमवू शकता.
भोपाळच्या एका सरकारी संस्थाने तयार केला आहे प्लांट..
भारतातील मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ येथे स्थित असलेल्या केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेने एक सोया मिल्क प्लांट विकसित केला आहे. हा प्लांट एका तासात 100 लिटर पर्यंत दूध तयार करू शकतो.
सोयामिल्कची बाजारातील किंमत
आपल्या भारतीय बाजारात एक लिटर सोया दूध 40 रुपयांला विकले जाते आणि एक किलो सोया टोफू 150-200 रुपयांना विकले जात आहे. सोया मिल्क तयार करण्यासाठी लिटरमागे 15 रुपये आणि टोफूवर 50 रुपये खर्च येतो.
संदर्भ : कृषी जागरण