‘या’ मसाले पिकाची लागवड करा मिळेल मोठा फायदा…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : तमालपत्र हे मसाल्याचे एक पीक आहे. रोजच्या जेवणात याचा वापर घराघरात हमखास केला जातो. मात्र तमालपत्राची शेती देखील तुम्हाला चांगला नफा मिळवून देऊ शकते. तमालपत्राला इंग्रजीत बे लीफ असे म्हटले जाते.अन्नपदार्थ चवदार करण्यासाठी मसाले म्हणून तमालपत्राचा वापर केला जातो. अनेक वर्षांपासून त्याची निर्मिती केली जात आहे. भारत, रशिया, मध्य अमेरिका, इटली, फ्रान्स आणि उत्तर अमेरिका आणि बेल्जियममध्ये तमालपत्राचे मोठ्याप्रमाणावर उत्पादन घेतले जाते.

तमालपत्राची शेती कशी सुरु कराल?
आपण तमालपत्राची लागवड सहजपणे सुरू करू शकता. ही शेती करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीच्या टप्प्यात थोडी मेहनत करावी लागेल. जसजसे झाडे वाढतात तसतसे तुमच्या उत्पन्नात वाढ होत जाईल. राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाकडून तमालपत्राची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना 30 टक्के अनुदान दिले जाते.

किती उत्पन्न मिळणार?
नफ्याबद्दल बोलायचे झाले तर एका तमालपत्राच्या रोपातून तुम्ही वर्षाला 5 हजार रुपये कमवू शकता. दुसरीकडे, जर तुम्ही वर्षाला 25 तमालपत्राची झाडे लावली तर तुम्हाला 75 हजार ते 1 लाख 25 हजार वार्षिक उत्पन्न मिळू शकते.