हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाळा लांबल्यामुळे रब्बी हंगामाच्या तारखा सुद्धा लांबलया आहेत. सध्या राज्यातील शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरु आहे. राज्यात रब्बी हंगामात ज्वारी, हरभरा, कांदा ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. मात्र पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया खूप महत्वाची असते. ही बीजप्रक्रीया आहे तरी काय? पिकासाठी याचा काय फायदा ? याची माहिती आजच्या लेखात घेऊ
नेमकी बीजप्रक्रिया कशी केली जाते ?
बीजप्रक्रिया ही अत्यंत साधा आणि सोपी पध्दत पण तेवढीच महत्वाची आहे. कारण यावरचे पीकाची उगवणक्षमता अवलंबून असते. तर पेरणीपूर्वी अवघ्या एक ते दोन तास आगोदर शेतकऱ्यांनी जे बियाणेची पेरणी करायची आहे त्या एक किलो प्रति बियाणाला 3 ग्रॅम थायराम किंवा कॅप्टन अन्यथा बाविस्टीन यापैकी एकाने ते बियाणात मिसळयाचे आहे. त्यानंतर रायझोबियम या जीवाणू संवर्धकाची 10 मिली प्रति 1 किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रीया करुन हे बियाणे सावलीत वाळवून लगेच पेरणी करावी लागणार आहे. मात्र, वरती सांगितल्याप्रमाणेच शेतकऱ्यांनी प्रक्रिया करणे आवश्यक आहे.
बीजप्रक्रियेचे फायदे काय आहेत ?
बीजप्रक्रिया करुन योग्य अंतरावर पेरणी केली तर उगवण क्षमता ही चांगली होणार आहे. शिवाय उगवून आलेल्या झाडांची मर होत नाही. एवढेच नाही तर भविष्यात रब्बी हंगामातील पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव होत नाही.
शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी
शेतकऱ्यांनी आगोदर फर्टीलायझरची बीजप्रक्रीया करायची आहे. त्यानंतर बायोफर्टीलायजरची बीजप्रक्रिया ही महत्वाची आहे. हा क्रम चुकला तर बीजप्रक्रियेचा काही उपयोग होणार नाही. पेरणीपूर्वी ही प्रक्रिया अगदी काही वेळेची असली तरी उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाची असल्याचे गंगाखेडचे तालुका कृषी अधिकारी बनसावडे यांनी सांगितले आहे.
सध्या शेतीशाळांमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन
रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांनी कशा पध्दतीने परेणी करावी याबाबत शेती कार्यशाळा घेतल्या जात आहेत. या दरम्यान, बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक करुन दाखवले जात आहे. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
बीजप्रक्रिया केल्याशिवाय पेरणीच करु नये
दरवर्षी शेतकरी हे पारंपारिक पध्दतीने पेरणीला सुरवात करतात. पण यंदा बीजप्रक्रिया करुनच पेरणी करावी लागणार आहे. म्हणेज रासायनिक खताची मिसळण किंवा जैविक पध्दतीने ही बीजप्रक्रिया करावी लागणार आहे.यामुळे हरभऱ्याला जो मर रोगाचा धोका असतो तो कमी होतो. शिवाय यंदा अधिकच्या पावसामुळे जमिनीत पाणी आहे. त्यामुळे जमिनीत बुरशीचेही प्रमाण असणार आहे. यापासून पेरणी केलेल्या बियाला धोका होऊ नये म्हणून ही बीजप्रक्रिया महत्वाची आहे.
संदर्भ : टीव्ही ९