हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या कोणत्याही पिकांचा विचार केला तरी त्या पिकांना स्लरी ही नवीन पद्धत खूप फायदेशीर ठरत आहे.परंतु शेतकरी अजूनही स्लरीचा पाहिजे तितका उपयोग करत नाहीत.स्लरी चा उपयोगितेचा विचार केला तर स्लरी शेतात वापरल्याने जमिनीमधील सूक्ष्म जिवाणू कार्यान्वित होतात.
जिवाणू मुळे जमिनीमधील अन्नद्रव्य पिकास उपलब्ध होते. याचे उदाहरणच द्यायचे झाले तर आपण जेव्हा जमिनीमध्ये युरिया टाकतो तेव्हा तो अमोनिकल स्वरूपात असतो व तो पिक घेऊ शकत नाही. द्या अमोनिकल स्वरूपाचे रूपांतर नाइट्रेट मध्ये करण्याचे काम नायट्रो सोमोनासबॅक्टेरिया करतात. या लेखात आपण स्लरीचा एक प्रकार म्हणजे जिवाणू स्लरी चे फायदे आणि कशी बनवायची हे जाणून घेऊ.
जिवाणू स्लरी म्हणजे काय व तिचे फायदे
–नत्रयुक्त जिवाणू स्लरीमुळे हवेतील अन्न शोषले जाऊन ते पिकांना फायदेशीर ठरते.
–जिवाणू स्लरी मुळे आती द्राव्य स्वरूपातील स्फुरद विरघळून पिकांना उपलब्ध करून दिले जाते.
–सेंद्रिय पदार्थांची जलद विघटन क्षमता वाढते.
–बियाण्याची उगवणक्षमता वाढते.
–पिकांची जोमदार वाढ होऊन व रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
–जमिनीचा पोत सुधारतो.
–रासायनिक खतांवरील खर्चात कपात होते.
–हे जिवाणू नैसर्गिक आहेत म्हणून त्याचा जमिनीवर व पिकांवर जास्त मात्रेने दुष्परिणाम होत नाही.
जिवाणू स्लरी कशी बनवायची?
ताजे शेण20 किलो, गावरान गाईचे गोमुत्र दहा लिटर, काळा गूळ दोन किलो, अझोटोबॅक्टर 500 ग्रॅम,पोटॅश मोबिलीझर 500 ग्रॅम इतर जैविक बुरशीनाशक एक किलो आणि 200 ते 250 लिटर पाणी सिमेंटच्या टाकीत टाकून चांगल्याप्रकारे मिसळावे.
वरील सर्व स्लरी द्रावण पाच ते सहा दिवस ठेवावे. दररोज सकाळी दोन मिनिटे व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. त्यानंतर सातव्या दिवशी वापस सावरून जमिनीतून पिकाला आळवणीकरावी.
संदर्भ : कृषी जागरण