राज्यात हवामान कोरडे राहणार ; दिवसा उन्हाचा चटका…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गेल्या आठवडाभरापासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली आहे. हवामानामुळे थंडी कमी झाली आहे. आज पासून म्हणजेच दिनांक 25 पासून राज्याच्या अनेक भागात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. मंगळवारी दिनांक 23 रोजी राज्याच्या अनेक भागात अंशतः ढगाळ हवामान होते. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्‍या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारी दिनांक 24 रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कोल्हापुरातील चंदगड इथं 30 मिलिमीटर, सोलापूर मधील मोहोळ आणि लातूर निलंगा येथे प्रत्येकी दहा मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

आज पुण्यात16.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

हवामान तज्ञ केस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यात आज कमीत कमी 16.8 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली ही नोंद शिरूर येथे करण्यात आलेली आहे. तसेच पुण्यातील बालवाडी इथे 23.3, चिंचवड इथं 22.5, जुन्नर 19.8, आंबेगाव 18.3, मगरपट्टा 23.8, शिवाजीनगर 18.7, तळेगाव 18.8, दौंड 22.5, पाषाण 18.1, इंदापूर,20, धुळगाव 20, ढमढेरे वीस, खेड 19.7, वडगाव शेरी 23.6, पुरंदर 20.5, राजगुरुनगर 19.1, हवेली 17.2, नेमगिरी 18.9, शिरूर 16.8, अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची पुण्यामध्ये नोंद करण्यात आली आहे.

 

कमाल आणि किमान तापमान

पावसाने उघडीप देताच राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाल्याने अनेक ठिकाणी तापमान 32 अंशांच्या पुढे गेले दुपारी उन्हाचा चटका आणि उकाड्यातही वाढ झाली. बुधवारी दिनांक 24 सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये परभणी आणि यवतमाळ या उच्चांकी 35.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा हा 20 अंशांच्या पुढे असून निफाड येथे नीचांकी 18.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
दरम्यान बंगालचा उपसागर मध्ये असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे आज दिनांक 25 रोजी कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे ही प्रणाली तमिळनाडू आणि श्रीलंकेच्या किनार्‍याकडे सरपंचाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.