हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपातील सोयाबीन , उडीद पिकाला पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. खारिपातील तूर पीक आता वावरात आहे. मात्र या तूर पिकावर देखील अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा मोठा परिणाम झाला आहे. वावरातल्या तूर पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे महागडी फवारणी हा एकमेव पर्याय शेतकऱ्यांच्या हातात राहिला असून तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
दुरगामी उपाययोजनाच गरजेची
–वातावरणातील बदलामुळे किड, रोगराईचा प्रादुर्भाव हा दोन्ही हंगामातील पिकांवर राहणार आहे.
–त्यामुळे सातत्याने औषध फवारणीवरही मोठ्या प्रमाणात पैसा हा खर्ची करावा लागत आहे.
–आता शेतकऱ्यांनी तात्पूरती उपाययोजना न करता तुरीची पेरणी करताना बियाणांमध्ये बदल करावा, बीडीन 711 व बीडीन 716 या मररोग प्रतिबंधक जातीच्या वाणाचा वापर वाढवणे गरजेचे आहे.
–फेरपालट पध्दतीने पीक घ्यावे.
–पेरणीपुर्व थायरम अधिक काबॅक्सिन पावर 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणाता बीजप्रक्रिया करावी.
–तूर पिकांमध्ये ट्रीकोडर्मा 4 किलो प्रति एकरी 200 लिटर पाण्यातू फवारणी करावी, तूरीच्या खोडावर फियटोपथोरा बलाईटचे काळे ठिपके दिसताच रेडोमिल –गोल्ड 25 ग्रॅम प्रति लिटर 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे गरजेचे आहे.
–बीजप्रक्रिया हा महत्वाचा भाग आहे. ती पूर्ण करुनच पेरणी केली तर फायदा होणार आहे.