हॅलो कृषी ऑनलाईन : लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सोयाबीनचे दर हे स्थिर होते. तर दुसरीकडे आवक कमी असतानाही ही परस्थिती असल्याने चिंता व्यक्त केली जात होती. पण शुक्रवारी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितामध्ये आवकही वाढली आणि 100 रुपयांनी दरातही वाढ झाली आहे. राज्यातील इतर बाजारसमितीचा विचार करता लातूरसह, वसमत, हिंगोली, नागपूर, बीड, मुरूम या कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला कमाल भाव ७०००वर मिळाले आहेत.
साठ्यावर मर्यादा नाही
आता सोयाबीन साठ्यावर सरकारची मर्यादा राहणार नाही. यामुळे व्यापारी आणि प्रक्रिया उद्योजक हे सोयाबीनची खरेदी मोठ्या प्रमाणात करीत आहेत. ही बाब शेतकऱ्यांच्या दृष्टीने चंगली आहे. तीन दिवसांपासून लातूर बाजार समितीमध्ये 6 हजार 450 वरच दर ठप्प होते. मात्र आज बाजारसमितीमध्ये सोयाबीनला ७१०० इतका कमाल भाव मिळाला.
अजूनही दर वाढीचे संकेत
सोयाबीनची मागणी अधिक आणि पुरवठा कमी अशी अवस्था झाली आहे. तर दुसरीकडे शेतकरी हे गरजेनुसारच विक्री करीत आहेत. दरवर्षी या दिवसांमध्ये लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 50 ते 60 हजार पोत्यांची आवक होत असते. यंदा मात्र, हंगाम सुरु झाल्यापासून एकदाही अशाप्रकारे आवक ही झालेली नाही. शेतकऱ्यांना अजूनही दर वाढीची अपेक्षा आहे आणि वाढती मागणी पाहता सोयाबीनचे दर वाढणार असल्याचे व्यापारीही सांगत आहेत. शेतकऱ्यांकडे सोयाबीन आहे पण ते गरजेप्रमाणेच विक्री करीत आहेत. हेच दरवाढीचे सर्वात महत्वाचे कारणही असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील आजचे बाजारभाव प्रति क्विंटल (किमान -कमाल -सर्वसाधारण )
जळगाव – 5800-5925-5925
माजलगाव -5600-6500-6250
राहुरी वाभोरी -5400-6600-6300
संगमनेर -6682-6682-6682
सिल्लोड -5951-6360-6300
कारंजा -5850-6600-6200
परळी वैजनाथ -5850-6600-6200
तुळजापूर -6600-6600-6600
राहता -6400-6700-6600
सोलापूर -6400-6755-6650
नागपूर -4800-7000-6450
अलमनेर -6250-6500-6500
हिंगोली -6190-7230-6710
अंबड -4900-6410-6000
लासलगाव -६600-6700-6675
लातूर -5899-7100-6900
जालना -5650-6650-6500
अकोला -5800-6800- 6400
बीड -5000-7000-6300
हिंगोली -6000-6700-6350