तुमच्याही शेतात पिकतात लाल चुटुक दर्जेदार डाळिंब ? जाणून घ्या निर्यात प्रक्रिया, मिळावा मोठा आर्थिक फायदा

pomegranate
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो शेतकरी आपल्या शेतात दिवसरात्र काबाडकष्ट करून पिके घेतो. शेतकऱ्याच्या कष्टाचे चीज म्हणून उत्पन्न चांगले येते सुद्धा मात्र बऱ्याचदा लोकल मार्केट मध्ये म्हणावे तसे उत्पन्न मिळत नाही. पण तुमचा माल दर्जेदार आणि निर्यातक्षम असेल तर मालाची निर्यात करून आपणही चांगला आर्थिक नफा मिळवू शकता. इतर शेती मालबरोबरच फळे देखील निर्यात केली जातात. सध्या देशातून डाळिंबाच्या निर्यात प्रक्रियेला सुरवात झाली आहे. आजच्या लेखात त्याबाबत माहिती घेऊया…

निर्यातक्षम डाळिंब बागांची नोंदणी करण्याची पध्दत

युरोपियन देशांना डाळिंब निर्यात करु इच्छिणाऱ्या डाळिंब बागायतदारांना त्यांच्या डाळिंब बागेची कृषि विभागाकडे ‘अनारनेट’द्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे. युरोपियन युनियन व इतर देशांना ताजी फळे व भाजीपाला निर्यात करू इच्छिणाऱ्या उत्पादकांना त्यांच्या बागांची/शेतांची नोंदणी/नुतणीकरण, हॉर्टीनेट ट्रेसेबिलीटी प्रणालीमध्ये नोंदणी करण्याकरीता महाराष्ट्रातील सर्व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये नोंदणी अधिकाऱ्याची नेमणूक करावी लागणार आहे. या नोंदणीप्रक्रियेची शेतकऱ्यांना माहिती व्हावी म्हणून स्थानिक वर्तमानपत्र, आकाशवाणी तसेच दूरदर्शनवरून इ.विविध प्रसिध्दी माध्यामांव्दारे प्रसिध्दी देण्यात येते.

कृषी विभागाकडे निर्यात करण्याच्या अर्जासोबत बागेचा स्थळदर्शक नकाशा व गाव नमूना नं. सात बारा या उता-याची प्रत जोडणे आवश्यक आहे. तर एक हेक्टरावरील डाळिंबासाठी नोंदणीसाठी 50 रुपये फी आकारली जाते. या सर्व नोंदणी आणि सर्व प्रक्रिया करण्यासाठी तालुका कृषी कार्यालयात एका कर्मचाऱ्याची नेमणूक केली जाते.

 आवश्यक कागदपत्रे
–विहीत प्रपत्रात अर्ज
–7/12 उतारा
–बागेचा नकाशा
–तपासणी अहवाल प्रपत्र (4अ)
–एक हेक्टरावरील क्षेत्राकरिता शेतकऱ्यांना 50 रुपये मोजावे लागतात.

ही प्रक्रिया पार केल्यानंतर मिळते मंजुरी
कागदपत्रांची पूर्तता करुन अर्ज मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडे सादर करावा लागणार आहे. त्यानंतर मंडळ कृषि अधिकाऱ्यांमार्फत बागेची प्रत्यक्ष तपासणी करुन प्रपत्र (4अ) मध्ये तपासणी अहवाल तयार करुन संबंधित शेतकऱ्यांचा प्रस्ताव नोंदणीकरिता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाकडे पाठविल्यानंतर ‘अनारनेट’ ऑनलाईन नोंदणी करण्यात येते. संबंधित शेतक-यांना एक वर्षाकरीता युरोपियन देशांना डाळिंब कोड, तालुका कोड, गाव कोड, फार्म व प्लॉट कोड नंबर संगणकाद्वारे देण्यात येतो. त्या नंबरनुसार पुढील सर्व कार्यवाही ऑनलाईनद्वारे करण्यात येते.

संदर्भ : टीव्ही ९