हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सुरवातीपासूनच सोयाबीनच्या दरात चढ-उतार झालेली पाहायला मिळत आहे. दिवाळीपूर्वी सोयाबीनला केवळ 3000-5000 पर्यंत दर मिळत होता. मात्र दिवाळीनंतर चित्र बदलत गेले आणि सोयाबीनच्या दरात वाढ होऊन दर 7000च्या वर गेला मात्र मागील दोन दिवसात सोयाबीनच्या दरात 400 रुपयांची घसरण झाली. त्यानंतर आज बुधवारी काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना लातूर कृषी उत्पन्न बाजर समितीत सोयाबीनचे दर 6000च्या वर गेले आहेत. त्यामुळे तूर्तास शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
आजचे सोयाबीन बाजारभाव प्रति क्विंटल (किमान -कमाल -सर्वसाधारण )
माजलगाव -4800-6211-6000
राहुरी वामभोरी -5500-6250-5875
संगमनेर -6100-6100-6100
उदगीर -6200-6320-6260
कारंजा -5525-6100-5850
परळी वैजनाथ -5900-6198-6025
राहता -6000-6301-6150
वडवणी -5600-5721- 5600
धुळे -5500-6105-6055
सोलापूर -4300- 6195-6055
सांगली -6000-7000-6500
नागपूर -4700-6300-5900
अमळनेर – 5200-6200-6200
हिंगोली -5900-6480-6190
कोपरगाव -4000-6225-6000
लातूर -5750-6700-6350
जालना -4900-6250-6100
अकोला -5100-6500- 5900
आर्वी -4500-6270-5700
चिखली -5600-6380-6090
बीड -5000-6300-5997
वाशीम -5200-6500-6000
पैठण -5686-5686-5686
धामणगाव -5530-6140-5750
परतूर -5976-6200-6150
गंगाखेड -6375-6475-6375