असे करा तुरीवरील फायटोप्थेरा (मर ) रोगाचे व्यवस्थापन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या खरिपातील एकमेव पीक तुरीचे पीक शेतकऱ्यांच्या शेतात आहे.शेंगा दाणे भरल्याच्या अवस्थेत आहेत. मात्र बदलते हवामान ढगाळ वातावरण यामुळे तुरीवर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. तुरीवरील फायटोप्धोरा आणि फ्युजॅरियम रोग यावरील व्यवस्थापन कसे करावे याची माहिती मराठवाडा कृषी विद्यापीठामार्फ़त देण्यात आली आहे जाणून घेऊया …

फ्युजॅरियम रोग आणि व्यवस्थापन
या रोगाची लक्षणे म्हणजे खोडावर काळे डाग पडून खाचा पडतात, हळु हळू झाड वाळायला लागते. हा फ्युजॅरियम मर रोग नाही, तर फायटोप्धोरा रोग आहे. त्यासाठी 20 ग्रॅम रिडोमील गोल्ड प्रति 10 लिटर पाण्यात या प्रमाणात खोडावर आणि झाडावर फवारणी करून आळवणी पण करावी.
तसेच ट्रायकोडर्मा 2.5 ग्राम/लिटर पाण्यातून फवारणी व आळवणी करावी.

तूरीवरील फायटोप्थेरा मर व्यवस्थापन
खोडावर काळे डाग पडून खाचा पडतात, हळु हळू झाड वाळायला लागते. हा फ्युजॅरियम मर रोग नाही, तर फायटोप्धोरा रोग आहे. त्यासाठी २५ ग्रॅम मेटालॅक्झील एम ४ टक्के+ मॅन्कोझेब ६४ टक्के (रिडोमील गोल्ड)(संयुक्त बुरशीनाशक) प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून खोडावर आणि झाडावर फवारणी करून आळवणी पण करावी. किंवा ट्रायकोडर्मा २५ ग्रॅम/ १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी व आळवणी करावी.