सोयाबीन, कापसाचा प्रश्न दिल्ली दरबारी ; सोयपेंड आयात करणार नाही याबाबत लेखी आदेश काढण्याची तुपकर यांची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीनला चांगला भाव मिळावा यासाठी अनेक शेतकरी संघटनी पुढाकार घेतला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वेळोवेळी सोयाबीन कापूस परिषदा घेऊन आंदोलने छेडली. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन कापसाचा प्रश्न थेट दिल्ली दरबारात मंडला आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल याची दिल्ली येथे भेट घेतल्याची माहिती रविकांत तुपकर यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून पोस्ट केलेल्या व्हिडीओ द्वारे दिली आहे. यावेळी पियुष गोयल यांनी केंद्र सरकर शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले तसेच सोयापेंड आयात केली जाणार नाही याबाबत आश्वासित केल्याचे सांगितले. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या काळात चांगला दर मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

 

वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत बोलताना आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये रविकांत तुपकर यांनी सांगितले की ,” मी मागील तीन दिवसापासून सोयाबीन ,कापसाच्या दराप्रश्नि दिल्ली येथे आहे. यावेळी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांची भेट घेऊन सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्या प्रश्नविषयी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे तसेच सोयपेंड आयात करण्याचा कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगितले”.

सोयपेंड आयात होणार नसल्याचा लेखी आदेश देण्याची मागणी
यावेळी तुपकर यांनी पुढे सांगितले की, यापूर्वी आंदोलनादरम्यान स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याशी गोयल यांनी फोनवरून सोयापेंडीच्या आयातीच्या प्रश्नाबाबत आठ दिवसात लेखी आदेश देण्याबाबत चर्चा झाली. मात्र सोयपेंड आयात न करण्याबाबत लेखी आदेश काही निघाला नाही . याबाबत लेखी आदेश काढण्यासंदर्भात मी गोयल यांच्याशी बोललो. सध्या संसदेची कामे आहेत पुढच्या आठ दिवसात लेखी आदेश काढू असे त्यांनी आश्वासित केले. पाम तेल आणि खाद्य तेल यावरील आयात शुलक वाढवले पाहिजेत अशी मागणी देखील केल्याचे त्यांनी सांगितले

सोयाबीन वरील ५ % जीएसटी रद्द करा
सोयाबीन वरील ५ % जीएसटी रद्द करा अशी मागणी देखील गोयल यांच्याकडे केली असता. ही बाब केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांच्याकडे येते त्यांच्याशी आपण बोलू. याविषयासंदर्भांत त्यांच्याशी बैठक करावी लागेल. शेतकऱ्यांच्या विरोधात कोणताही निर्णय घेणार नसल्याचे देखील पियुष गोयल यांनी सांगितले . ही बाब त्यांनी सकारात्मक पद्धतीने घेतली असल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगितले.