हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो यंदाच्या रब्बी हंगामाकरिता तुम्ही जर वाटण्याची लागवड केली असेल तर ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. सध्याचे वातावरण पाहता पिकांवर मोठ्या प्रमाणात किड आणि रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. वाटाण्यावर कोणते रोग आणि कीड लागते आणि त्यावर काय उपाय करायचे याची माहिती आजच्या लेखात घेऊया . सदर माहिती ही महाराष्ट्र राज्य कृषी विभाग यांच्या वतीने देण्यात आली आहे.
कीड व रोग
कीड
–वाटाणा पिकावर मावा, शेंगा पोखरणारी आली या किडींचा तर भुरी, मर रोग या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो.
मावा: हि कीड हिरव्या रंगाची अत्यंत लागण असते. ते पानातून रस शोषून घेतात. त्यामुळे झाडे निस्तेज बनतात.
शेंगा पोखरणारी अळी: हिरव्या रंगाची हि अळी प्रथम शेंगाची साल खाते व आत शिरते आणि दाणे पोखरून खाते.
उपाय – यासाठी मॅलॅथिऑन ५० ईसी, ५०० मिली किंवा फॉस्फॉमिडॉन ८५ डब्ल्यू ईसी, १०० मिली किंवा डायमेथोएन ३० ईसी, ५०० मिली किंवा मिथिलडेमेटॉन २५ ईसी, ४०० मिली, ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रती हेक्टरी फवारावे. पेरणीनंतर ३ आठवड्यांनी पहिली फवारणी करावी.
रोग
भुरी रोग – या रोगामुळे पिकाचे अतोनात नुकसान होते. या रोगात प्रथम पानांच्या दोन्ही बाजूंवर पांढरी पावडरीसारखी बुरशी दिसून येते. नंतर ती रोपाच्या सर्व हिरव्या भागावर जलद पसरते व झाडाची उत्पादनक्षमता त्यामुळे खालावते.
उपाय : यासाठी मार्फोलीन २५० मिली किंवा पानाय्त मिसळणारे गंधक 80 टक्के १२५० ग्रॅम किंवा डिनोकॅप ४० डब्ल्यू पी ५०० ग्रॅम प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. किंवा गंधकाची भुकटी ३०० मेश प्रतिहेक्टरी २० किलो या प्रमाणात धुरळावी. नंतर १५ दिवसांच्या अंतराने फवारणी / धुरळणी करावी. रोगास प्रतिबंधक अशा जातींचा वापर करावा.
मर रोग – या रोगाचा प्रसार जमिनीतील बुरशीमुळे होतो. रोगग्रस्त झाड पिवळे पडून वाळते
उपाय म्हणून पेरणीपूर्वी बियास थायरम हे बुरशीनाशक औषध प्रति किलोस ३ ग्रॅम या प्रमाणात चोळावे.