विदर्भ , उत्तर महाराष्ट्र गारठला ; २-३ दिवस तापमान आणखी खाली जाण्याची श्यक्यता…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे विदर्भ उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला तर उर्वरित राज्याच्या किमान तापमानातही घट होत आहे. बुधवारी दिनांक 15 रोजी निफाड येथे नीचांकी 12.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज दिनांक 16 रोजी राज्यात मुख्यतः कोरडे हवामानासह किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

उत्तर भारतात थंडीच्या लाटेची शक्यता
हिमालय पर्वत आणि लगतच्या शहरात हिमवर्षाव सुरू झाला असून पंजाब, हरियाणा, चंदीगड, राजस्थान मध्ये थंडीचा कडाका वाढत असून थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. बुधवारी दिनांक 15 रोजी पंजाबच्या अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील सर्वात निचांकी चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली उत्तरेकडील थंड हवा महाराष्ट्राकडे घेत असल्याने किमान तापमानात आणखी घट होणार आहे.

राज्याच्या बहुतांश भागात कमाल तापमान 30 अंश यांच्या खाली गेले. बुधवारी दिनांक 15 रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये रत्नागिरी येथे सर्वाधिक 32.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तर महाराष्ट्र विदर्भात किमान तापमानात घट होऊ लागली असून काही ठिकाणी पहाटेचा तापमान 13 अंश या पेक्षा कमी झाले आहे.

पुढील २-३ दिवसात थंडी आणखी वाढणार
हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील २-३ दिवस तापमान आणखी खाली जाण्याची श्यक्यता आहे.
आज नागपुरात १२. ४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे तर नांदेड , परभणीत देखील १४ अंशांच्या आसपास किमान तपमान पोहचले आहे . तसेच आज आज नोंदवलेल्या निरीक्षणानुसार राज्याच्या इतर भागात तापमान १४-१६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.