हॅलो कृषी ऑनलाईन : थंडी सुरु झाली की हिरवेगार चवदार मटार बाजारात यायला सुरु होतात. हिवाळ्यात मिळणारे मटार आपण टिकवून ठेऊन वर्षभर वापरू शकतो. किंबहुना आपण फ्रोजन मटारचा व्यवसायही सुरु करू शकतो. तुम्ही तुमच्या शेतात मटार पिवत असाल तर उत्तमच मात्र तुमच्या शेतात मटार पिकत नसले तरी तुम्ही मटार विकत घेऊनही हा व्यवसाय सुरु करू शकता.
कसा सुरू कराल फ्रोजन मटर व्यवसाय
–फ्रोजन मटर व्यवसाय हा आपल्या घरातूनच सुरू करता येऊ शकतो.
–जर हा बिझनेस मोठ्या स्केलवर सुरू करायचा असेल तर यासाठी 4000 ते 5000 स्क्वेअर फूट जागा आवश्यक आहे
–जर आपण छोट्या स्केलमध्ये हा व्यवसाय सुरू करत असाल तर तो आपण आपल्या घरातून देखील सुरू करू शकता
–शिवाय छोट्या स्केलवर व्यवसाय सुरू करण्यासाठी आपणास मटर सोलण्यासाठी एक्स्ट्रा लेबर ची आवश्यकता भासेल.
–मोठ्या स्केल मध्ये मटर सोलण्यासाठी मशिन्स विकत घ्यावे लागतात.
— आपणास हा व्यवसाय सुरू करण्यासाठी याच FSSAI कडून लायसन देखील काढावे लागेल.
प्रक्रिया
–मटार सोलल्यानंतर, ते सुमारे 90 अंश सेंटीग्रेड तापमानावर नेले जाते.
–नंतर मटारच्या अत्यंत थंड पाण्यात टाकले जाते, ज्याचे तापमान 3-5 अंश सेंटीग्रेड पर्यंत असते.
–जेव्हा जीवाणू अतिशय उष्ण वातावरणातून अतिशय थंड वातावरणात जातात तेव्हा त्यांचा मृत्यू होतो.
–यानंतर, मटार -40 डिग्री पर्यंत तापमानात ठेवले जातात, ज्यामुळे ते गोठतात.
–मग मटार आवश्यकतेनुसार लहान-मोठ्या पॅकेटमध्ये पॅक करून बाजारात विक्रीसाठी पाठवले जातात.
काय आहे कमाईचे गणित
— फ्रोजन मटर या व्यवसायातून 80 टक्क्यांपर्यंत कमाई हे केली जाऊ शकते.
–जर आपण शेतकऱ्यांकडून कच्चा मटर घेत असाल तर तो आपणास दहा रुपये किलोच्या दराने मिळून जाईल.
–असे सांगितलं जाते की 2 किलो ग्राम हिरव्या मटर मधून कमीत कमी एक किलो ग्रॅम मटरचे दाणे मिळतात.
–प्रोसेस केलेले मटर अर्थात फ्रोजन मटर हे बाजारातील 120 रुपये किलोने विकले जातात.
–वीस रुपयाच्या मटर मधून 120 रुपये निघतात.
— जर आपण रिटेल काउंटर वरती फ्रोजन मटर पॅकिंग करून विकला तर दोनशे रुपये किलो प्रमाणे फ्रोजन मटर विकला जातो.