हॅलो कृषी ऑनलाईन : आशिया खंडातील सर्वात मोठी असेलेल्या लासलगाव बाजारपेठेत कांद्याची मोठी उलाढाल होत असते. मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात मोठी चढ- उतार होत आहे. लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात तब्बल ९०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी सकाळच्या सत्रात 1 हजार वाहनातून लाल कांद्याची 18 हजारहुन अधिक क्विंटल आवक झाली होती. त्याला कमाल 2230 रुपये तर किमान 700 रुपये तर सर्वसाधारण 1700 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला आहे. तर गेल्या आठवड्यात लाल कांद्याची दिवसभरात 14 हजार क्विंटल आवक दाखल झाली होती त्याला कमाल 3100 रुपये, किमान 800 रुपये तर सर्वसाधारण 2525 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला होता. मोठ्या प्रमाणाात तफावत झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
लाल कांद्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. शिवाय आता खरीप हंगामातील कांद्याची काढणी कामे ही सुरु आहेत. अजून या खरीपातील कांद्याची आवक बाजारपेठेत झाली नसताना तब्बल 900 रुपयांची घसरण झालेली आहे. उद्या कांद्याची आवक वाढली तर दर घसरणार हे सांगायला कुण्या भविष्यकाराची गरज नाही. पण अवकाळीमुळे झालेले नुकसान, वातावरणामुळे कांद्याची रोपाची अवस्था पाहता यंदा दर तेजीच राहणार असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण कांदा आहे कधी शेतकऱ्यांच्या तर कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणारच पण आताची वेळ शेतकऱ्यांची आहे.
संदर्भ : टीव्ही ९