कापसाच्या दरात सुधारणा…! आज कमाल दर 10,235 वर; पहा आजचे कापूस बाजारभाव

cotton
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या दोन दिवसात कापसाच्या दरात घसरण झाली होती. हे दर १०० ते २०० रुपयांनी उतरले होते मात्र आजचे बाजारभाव हे अत्यंत समाधानकारक आहेत. आज कापसाच्या दराने पुन्हा उसळी घेतली आहे. आज कापसाचे जास्तीत जास्त दर 10,235वर पोहचले आहेत. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही आनंदवार्ता आहे.

आजचे बाजार भाव पाहता आज सर्वाधिक बाजार भाव हा पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत 10,235 इतका मिळाला आहे. पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मध्यम स्टेपल कापसाची सतराशे क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता कमीत कमी 9000 जास्तीत जास्त 10 हजार 235 आणि सर्वसाधारणपणे नऊ हजार सातशे रुपये इतका भाव मिळाला. त्याखालोखाल सिंधी सेलू इथं लांब स्टेपल कापसाची 1171 क्विंटल इतकी आवक झाली आहे. त्याकरिता कमीत कमी नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दहा हजार दोनशे तर सर्वसाधारण दर हा 9890 इतका मिळाला. आज सर्वाधिक आवक ही पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाल्याचे दिसून येत आहे ही आवक सतराशे क्विंटल इतकी आहे.

आजचे एकूण बाजार भाव पाहता सर्वसाधारण दर हा नऊ हजार दोनशे ते नऊ हजार सातशे रुपये दरम्यान आहे. बुधवारचे कापुस बाजार भाव बघता एकाही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दहा हजार इतका बाजार भाव मिळालेला नव्हता. हे बाजार भाव जास्तीत जास्त 9900 पर्यंतच होते मात्र आज पुन्हा कापूस बाजाराने उसळी घेतलेली दिसत आहे हे बाजार भाव दहा हजार 200 पर्यंत येऊन पोहोचले आहेत.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 13-1-22 कापूस बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/01/2022
HINGOLI—-QUINTAL40944995999524
PARSHIWANIH-4 – MEDIUM STAPLEQUINTAL100960096259615
JAMNERHYBRIDQUINTAL37782992258950
MANWATLOCALQUINTAL1600820097509600
DEULGAON RAJALOCALQUINTAL1500920097559500
KATOLLOCALQUINTAL180800096009200
SINDI (SELU)LONG STAPLEQUINTAL11719500102009890
VARORA-SHEGAONMEDIUM STAPLEQUINTAL117840097009400
PULGAONMEDIUM STAPLEQUINTAL17009000102359700
12/01/2022
AMARAWATI—-QUINTAL95920098009500
HINGOLI—-QUINTAL35945096009525
KINWAT—-QUINTAL115923093009250
RALEGAON—-QUINTAL500900096009450
BHADRAWATI—-QUINTAL21870095209110
SAMUDRAPUR—-QUINTAL227800098009000
VADVANI—-QUINTAL27820094008500
ARVIH-4 – MEDIUM STAPLEQUINTAL660900099009500
JAMNERHYBRIDQUINTAL30780094008900
KALMESHWARHYBRIDQUINTAL1801920096009400
JAFRABADHYBRIDQUINTAL256870089008821
UMAREDLOCALQUINTAL84900095009400
MANWATLOCALQUINTAL1600810096609550
DEULGAON RAJALOCALQUINTAL2000920097159500
VARORALOCALQUINTAL69840095519000
KATOLLOCALQUINTAL200850095008900
MANGRULPEERLONG STAPLEQUINTAL265870096009200
HINGANGHATMEDIUM STAPLEQUINTAL1820830099359070
KHAMGAONMEDIUM STAPLEQUINTAL337840094008900
VARORA-SHEGAONMEDIUM STAPLEQUINTAL89835095509200
YAWALMEDIUM STAPLEQUINTAL20707579907620
HIMAYATNAGARMEDIUM STAPLEQUINTAL39910093009200
CHIMURMEDIUM STAPLEQUINTAL446975097609751
PULGAONMEDIUM STAPLEQUINTAL2900900099519500
NARKHEDNo. 1QUINTAL257900095009300