हॅलो कृषी ऑनलाईन : नगदी पीक म्हणून शेतकरी कांदा या पिकाकडे बघतात. सध्या राज्यातील विविध बाजार समित्यांचा विचार करता आवाक वाढली आहे मात्र दर घसरल्याचे दिसून येत आहे. मागील तीन आठवड्यात कांद्याचे कमाल दर तीन हजारांच्या वर होते. मात्र सध्याचे दर पाहता सर्वसाधारणपणे 1000ते 2500 च्या दरम्यान आहेत.
आजचे कांदा बाजार भाव पाहता पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांद्याला सर्वाधिक चार हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 486 क्विंटल आवक झाली. याकरिता कमीत कमी भाव दोनशे रुपये, जास्तीत जास्त भाव चार हजार आणि सर्वसाधारण भाव 1900 रुपये प्रति क्विंटल इतका राहिला. साताऱ्यात मात्र कांद्याला चांगला भाव मिळतो आहे आज साताऱ्यात कांद्याला प्रतिक्विंटल जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपये इतका भाव मिळाला आहे. त्याखालोखाल मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे तीन हजार रुपये इतका भाव मिळाला आहे याशिवाय वाई कृषी उत्पन्न बाजार समितीत ही तीन हजाराचा भाव कांद्याला मिळाला आहे.
(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )
आजचे 27-1-22 कांदा बाजारभाव