तापमानात दोन दिवस वाढ, त्यानंतर पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता…!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात आता हळूहळू तापमानात वाढ होताना दिसत आहे. राज्यातल्या काही भागात किमान तापमान हे दहा वर्षांच्या आत आहे. धुळे इथं पारा सहा वर्षांच्या आसपास गेला तर सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये सांगली इथं कमाल तापमान 36.5 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले आहे. आज दिनांक 1 फेब्रुवारी रोजी राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

दरम्यान सोमवारी पंजाब मधील हिस्सार येथे देशाच्या सपाट भागावरील नीचांकी 3.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. देशाच्या किमान तापमानात दोन दिवस वाढ होणार असून त्यानंतर पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता आहे. उत्तर अरबी समुद्राने गुजरातच्या किनार्‍यालगत 40 ते 60 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

कमाल आणि किमान तापमानात तफावत

निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ५.७ अंश सेल्सिअस, धुळे येथील कृषी महाविद्यालयात ६ अंश तर जळगाव आणि परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात 7.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नाशिक अमरावती गोंदिया नागपूर येथे 10 वर्षांपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान दहा अंशांच्या पुढे गेल्या अनेक ठिकाणी कमाल तापमान 30 अंश यांनी पार केले असून दिवसाच्या कमाल आणि रात्रीच्या किमान तापमानात पंधरा ते पंचवीस अंशांची तफावत दिसून येत आहे.

कुठे किती तापमान

हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक 1 फेब्रुवारी रोजी जळगाव येथे 7.5 नाशिक 9.5 पुणे 9.9, मालेगाव 11.4, बारामती 11.4,, सातारा 13, कोल्हापूर17 सातरा 13, महाबळेश्वर 14.4, अहमदनगर 8.8, उस्मानाबाद 12.1 ,जेऊर 11 ,माथेरान 14.8, सांगली 15.3 ,चिकलठाणा 10.8, नांदेड 12.2, परभणी 14.5, ठाणे अठरा ,रत्नागिरी 16.5, नागपूर 10.6, आणि कुलाबा 17.5 सांताक्रुज 14.8 इतके तापमान नोंदवण्यात आले आहे.