Agriculture Electricity : बीडच्या शेतकऱ्याचा महावितरणवर लाचखोरीचा आरोप; मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी!

Agriculture Electricity)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या सरकारी पातळीवरील भ्रष्टाचाराच्या (Agriculture Electricity) बऱ्याच घटना समोर येत आहे. लाचलुचत प्रतिबंधक विभागाच्या याबाबतच्या बातम्या देखील रोजच माध्यमांमध्ये झळकताना दिसतात. मात्र, आता एका शेतकऱ्याकडून मेन विद्युत वाहिनीच्या जोडणीसाठी महावितरणच्या एका कनिष्ठ अभियंत्याने थेट २ लाख रुपयांची लाच मागितल्याची (Agriculture Electricity) घटना समोर आली आहे.

मुख्यमंत्री, उर्जामंत्र्यांकडे कारवाईची मागणी (Agriculture Electricity)

बीड जिल्ह्यातील शेतकरी श्रीकर फड असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील रहिवासी आहेत. त्यांनी स्थानिक महावितरण कार्यालयातील महावितरण कनिष्ठ अभियंत्यावर (Agriculture Electricity) लाचखोरीचा आरोप केला असून, त्यांनी याबाबत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे ऊर्जामंत्री यांना संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचो मागणी केली आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने संबंधित अधिकाऱ्याची थेट तक्रार करताना, पुरावा म्हणून चिठ्ठी देखील सादर केली आहे.

काय आहे शेतकऱ्याचा आरोप?

शेतकरी श्रीकर फड यांचे म्हणणे आहे की, आपण आपल्या शेतातून मेन विद्युत वाहिनी जाताना ती भूमिगत प्रकारे आवेदन अर्ज केला होता. मात्र, आपल्याला विद्युत खांब उभे करून, अल्युमिनियमच्या तारा ओढून वीज जोडणी देण्यात आली आहे. आपण ज्या पद्धतीने मेन विद्युत वाहिनी जाण्याची मागणी केली होती. त्याच प्रकारे जोडणी मिळणे गरजेचे होते. याबाबत आपण स्थानिक महावितरण विभागाकडे चौकशी केली असता, आपल्या प्रश्नाचे निराकरण होण्याऐवजी याउलट माझ्या शेतातील मेन विद्युत वाहिनीचे काम भूमिगत करून देण्यासाठी स्थानिक महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांनी आपल्याकडे २ लाख रुपये लाच मागितली असल्याचा आरोप शेतकरी श्रीकर फड यांनी केला आहे.

11 स्थानिक शेतकऱ्यांचीही तक्रार

विशेष म्हणजे शेतकरी श्रीकर फड यांच्याप्रमाणेच अंबाजोगाई तालुक्यातील पूस या ठिकाणी जवळपास ११ शेतकऱ्यांनाही अशीच काहीशी समस्या आहे. गिरवली सब सटेशनपासून घाटनंदूरपर्यंत 33 केवी वीज वाहिनीला गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात ५० वर्ष पूर्ण झाले आहेत. याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी १५ डिसेंबर २०२३ रोजी स्थानिक महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली आहे. वीज वाहिनीला खूप कालावधी झाल्याने यातून मोठी दुर्घटना होऊ शकते. अलीकडेच वादळी पावसादरम्यान होणारी दुर्घटना टळली आहे. त्यामुळे या ११ शेतकऱ्यांनी देखील या वीज वाहीनीबाबत खबरदारीचा इशारा महावितरणला दिला आहे.