शेतकरी मित्रांनो तुमच्याही शेतात कांदा पिकाचे शेंडे पिवळे पडत आहेत ? जाणून घ्या कारणे आणि उपाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो तुम्ही जर तुमच्या शेतात कांद्याची लागवड केली असेल तर तुमच्यासाठी हा लेख महत्वाचा आहे. बऱ्याचदा कांद्याच्या रोपांचे शेंडे पिवळे पडलेले दिसतात. आजच्या लेखात आपण त्यामागची कारणे आणि उपाय कोणते आहेत ते जाणून घेऊया…

कांद्याचे शेंडे पिवळे पडण्याची कारणे

१)सर्वात महत्वाचे कारण म्हणजे कांदा पिकावरील बुरशीचा प्रादुर्भाव.
२) अन्नद्रव्यांची कमतरता.
३)जादा पाऊस
४) पिकांना अति पाणी पाजणे
५) हिवाळ्यात धुके पडल्यामुळे
६)कांद्याच्या मुळांची नीट वाढ न होणे
७)कांद्यावर करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे देखील कांद्याच्या पातीवर शेंड्यावर पिवळे तपकिरी चट्टे पडतात आणि त्यानंतर ते सुरकुतलेले , जळल्या सारखे दिसतात.

काय कराल उपाय उपाय

— पेरणीपूर्वी बियाण्यास कार्बेन्डाझिम दोन ग्रॅम अधिक कॅप्टन दोन ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

— कांद्याच्या रोपवाटिकेतील रोपांची उगवण झाल्यानंतर पंधरा दिवसातुन मॅन्कोझेब 25 ग्रॅम आधीक डायमेथोएट 15 मिली आधीक स्टिकर 10 मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात दोन वेळा फवारणी करावी.

— कांद्याच्या रोपाची लागवड करण्यापूर्वी मॅन्कोझेब 25 ग्रॅम आणि कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्याच्या द्रावणात बुडवून लागवड करावी.

— कांदा वरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी रोगाची लक्षणे दिसतात 10 ते 15 दिवसांच्या अंतराने मॅन्कोझेब 25 ग्रॅम किंवा ट्यूबकोन्याझोल 10 मिली या बुरशीनाशकांची फवारणी 10 लिटर पाण्यात मिसळून करावी.

— या काळात फुलकिडीचा प्रादुर्भाव वाढतो त्याच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट (30%इसी ) 15 मिली किंवा लॅबडा सायहॅलोत्रीण (5%इसी) सहा मिली अधिक स्टिकर दहा मिली प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे आलटून पालटून फवारणी करावी.

–कांद्याला पाणी देताना जादा पाणी देण्याऐवजी हलके पाणी द्या.

— कांद्याचे शेंडे पिवळे पडले असतील किंवा वाढ नीट होत नसेल तर जैविक उपाय म्हणून १५ लिटर पंपासाठी २०० मिली गोमूत्र अधिक २०० मिली दुधाची फवारणी पिकांवर करावी