Alu Lagwad : अळू लागवडीतून मिळेल भरघोस नफा; ‘या’ आहेत प्रमुख पाच प्रजाती!

Alu Lagwad Best Option For Farmers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : बाजारात आपल्याला अळूची भाजी (Alu Lagwad) हमखास पाहायला मिळते. अळूची भाजी ही तशी दुर्मिळ असते. मात्र, सध्या एकाच भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होऊन, दर घसरणीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. अशावेळी काही शेतकरी राज्यात वेगळा मार्ग निवडत अळूची शेती करताना आढळून येत आहे. विशेष म्हणजे अळूचे आयुर्वेदिक गुणधर्म असल्याने, काही जण अळूच्या भाजीचा प्रकर्षाने आहारात समावेश करतात. याच पार्श्वभूमीवर आज आपण अळू लागवड आणि अळूच्या अधिक उत्पादनक्षम प्रजातीबद्दल (Alu Lagwad) जाणून घेणार आहोत…

पाणी असल्यास बारमाही पीक (Alu Lagwad Best Option For Farmers)

अळू हे जोमाने वाढणारे पीक आहे. अळूच्या पानांचा उपयोग आहारात वडी तयार करून केला जातो. याशिवाय अळूचे कंद उकडून खाल्ले जातात. खरिप हंगामातील अळू लागवड (Alu Lagwad) जून-जुलै महिन्यात करतात. तर पाण्याची सोय असल्यास वर्षभर अळूचे पीक घेता येते. प्रामुख्याने कोकण पट्ट्यात अळूचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याने अळू उत्पादन घेण्यात आपले स्थान निर्माण केले आहे.

किती मिळते उत्पादन?

साधारणपणे अळूची पाने लागवडीनंतर वाणानुसार चार ते पाच महिन्यात तोडणीला येतात. पूर्ण वाढलेली पाने जमिनीलगत देठासह कापून, गड्ड्या बांधून विक्रीला पाठवावी. पहिल्या वेळी पाने काढल्यानंतर पुन्हा 15 ते 18 दिवसांच्या अंतराने पाने काढणीस तयार होतात. एकदा केेलेल्या लागवडीपासून 1.5 ते 2 वर्षे पाने मिळत राहतात. अळूचे जवळपास 4 ते 5 टन दर हेक्टरी, हिरवी पाने आणि कंदासाठी लागवण्यात येणार्‍या जातींपासून सुमारे 6 ते 7 टन दर हेक्टरी कंद एवढे उत्पादन मिळते.

अळूच्या प्रमुख प्रजाती

१. राजेंद्र अळू : राजेंद्र अळू हे वाण कंदांची लागवड केल्यानंतर जवळपास १६० ते १८० दिवसांमध्ये पाने काढणीला येतात. या वाणापासून प्रति हेक्टरी १८० ते २०० क्विंटल उत्पादन मिळते.

२. व्हाईट गौरेय्या : व्हाईट गौरेय्या हे अळू वाण लागवडीनंतर (Alu Lagwad) जवळपास १८० ते १९० दिवसांमध्ये पाने तोडणीला येतात. या वाणाच्या लागवडीपासून शेतकऱ्यांना हेक्टरी १७० ते १९० क्विंटल उत्पादन मिळते.

३. पंचमुखी अळू : पंचमुखी अळू हे वाण कंद लागवडीनंतर सुमारे १८० ते २०० दिवसांमध्ये काढणीला येते. ज्यातून हेक्टरी २०० ते २५० क्विंटल इतके हेक्टरी उत्पादन मिळते.

४. मुक्ताकेशी : मुक्ताकेशी हे अळू वाण १६० ते १७० दिवसांमध्ये पाने तोडणीला येतात. या वाणापासून तुम्हाला हेक्टरी २०० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते.

५. आजाद अळू : आजाद अळू हे वाण केवळ १२० दिवसांमध्ये अर्थात ४ महिन्यांमध्ये काढणीला येते. या वाणापासून हेक्टरी २५० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.

अळूचे आयुर्वेदिक गुणधर्म

अळूची पाने ही जीवनसत्व ‘अ’चे मुख्य स्रोत आहेत. ज्यामुळे डोळे निरोगी राहण्यास मदत होते. अळूची पानांमध्ये जीवनसत्व ‘क’ देखील मोठ्या प्रमाणात आढळते. यामुळे कॅन्सरग्रस्त असलेल्या रुग्णांनी अळूचा आहारात समावेश केल्यास त्यांना अनेक फायदे मिळतात. अळूच्या आहारातील समावेशामुळे कर्करोगाच्या, ट्यूमरच्या वाढीस प्रतिबंध होतो. याशिवाय कर्करोगाच्या पेशींच्या प्रसाराची प्रगती कमी होते. इतकेच नाही तर एका अभ्यासानुसार, अळूची पाने नियमित आहारात समाविष्ट केल्याने कोलन कर्करोगाचे प्रमाण कमी होऊ शकते, असे दिसून आले आहे.