Bajar Bhav: लसूण 200 पार; पालेभाज्या व इतर भाज्यांचेही चढते भाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या भाजीपाला बाजारभावात (Bajar Bhav) चढता आलेख असून लसूण सोबतच पालेभाज्या आणिइतर भाजीपाल्याचे भाव वाढलेले आहेत. उन्हाळ्यामुळे भाजीपाल्याचे दर चांगलेच चढले असून, लसणाच्या दरातही (Garlic Rate) तेजी कायम आहे. किरकोळ बाजारात दर्जेदार लसणाला पाव किलोसाठी 50 ते 60 रुपये मोजावे लागत आहेत. मार्च, एप्रिल महिन्यांतील उष्णतेच्या लाटेचा भाजीपाला लागवडीवर (Vegetable Cultivation) परिणाम झाला. परिणामी वांगे, शेवगा, गवार सोडता टोमॅटो, कोबी, लसूण, भेंडी यांसह इतर भाज्यांचे दर (Vegetable Rate Today) चांगलेच वाढले आहेत.

मे महिन्यापासून जिल्ह्यातील विविध भागांत अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) तडाखा सुरूच आहे. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यात रब्बी हंगामात लसणाचे उत्पादन अत्यंत कमी झाले. 

यात भरीस भर अवकाळीच्या वातावरणामुळे उपलब्ध लसूण, कांदा खराब होत आहे. तसेच राजस्थान आणि गुजरातमधून होणारी आवक घटली आहे. मागणीच्या तुलनेत बाजारात लसणाची आवक कमी झाल्याची माहिती धाराशिव बाजारात समितीच्या (Dharashiv Bajar Samiti) निरीक्षकांनी दिली.

घाऊक बाजारात सध्या 10 किलो लसणाला प्रतवारीनुसार 800 ते 1000 रुपये असे दर (Bajar Bhav) मिळत आहेत. किरकोळ बाजारात एक किलो लसणाची विक्री प्रतवारीनुसार 200 ते 250 रुपये किलो दराने होत आहे. सोबतच पालेभाज्याही महागल्या आहेत.

अवकाळी पाऊस, वादळ वाऱ्याचा फटका

जिल्ह्यातील भाजीपाल्यावर प्रथम उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) परिणाम झाला आहे. त्यानंतर अवकाळी पावसामुळे उत्पादित मालावर परिणाम होत आहे. काढलेल्या कांदा व लसणावर परिणाम होत आहे. कांदे नासत असून लसूण खराब होत आहे. भाजीपाल्याची फूलगळती होऊन रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च (production Cost) वाढत आहे.

या भाज्या स्वस्त

किरकोळ बाजारात सध्या वांगे, शेवगा, कांद्याची आवक अधिक आहे. यामुळे दर अत्यंत कमी आहेत. यामुळे शेतकर्‍यांना हा भाजीपाला बाजारात आणण्याचा खर्चही निघत नाही.

या भाज्या महाग

किरकोळ बाजारात बटाटे, भेंडी, कोबी, टोमॅटोचे दर चढे आहेत. सध्या बटाटे 30 ते 40 रुपये किलो, टोमॅटो 30, भेंडी 60 रुपये किलो, कोबी 60 रुपये किलोने विक्री (Bajar Bhav) सुरू आहे.

पालेभाज्याही महाग (Bajar Bhav)

मेथी, शेपू, चुका, पालक 10 ते 20 रूपयांपर्यंत पेंढी मिळत आहे. यामध्ये 10 रुपयांना पालक, शेपू 15 ते 20, तर मेथी 20 रुपयांना पेंढी मिळत आहे.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.