हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याचे वातावरण पाहता दिवसा आणि रात्रीच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे. गरमीमुळे नागरिक हैराण झाले आहेत . दरम्यान ३० मार्च रोजी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या तीन चार दिवसांसाठी महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे उन्हाचा चटका कायम राहणार आहे. नारिकानी सतर्क राहून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
केरळ पासून उत्तर कर्नाटका पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. बिहार पासून पूर्व विदर्भ पर्यंत असलेले कमी दाबाचा पट्टा विरून गेल्याने गेल्या दोन-तीन दिवसांपासून वाढलेला किमान तापमानाचा पारा सोमवारी अचानक घसरला सोमवारी निफाड येथील गहू संशोधन केंद्रात किमान तापमानात मोठी घट झाल्याने 6.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर धुळे येथील कृषी महाविद्यालयात नऊ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. दरम्यान चंद्रपूर येथे सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
कधी ,कोणत्या भागाला उष्णतेचा यलो अलर्ट
31मार्च – आज दिनांक 31 मार्च रोजी जळगाव, अहमदनगर, सोलापूर, जालना ,परभणी ,हिंगोली ,यवतमाळ ,अकोला ,अमरावती, आणि चंद्रपूर या भागाला उष्णतेसाठी चाललो अलवर हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
1एप्रिल – दिनांक एक एप्रिल साठी अकोला, बुलढाणा, जळगाव, औरंगाबाद, जालना ,परभणी ,हिंगोली ,सोलापूर आणि अहमदनगर या भागाला यलो अलर्ट देण्यात आलाय.
2-एप्रिल – दिनांक 2 एप्रिल साठी जालना, परभणी ,हिंगोली ,अकोला आणि बुलढाणा या भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यातील कमाल तापमान
काल दिनांक 30 मार्च रोजी राज्यातील कमाल तापमानाची नोंद करण्यात आली ती पुढील प्रमाणे पुणे 39.5, कोल्हापूर 39.6, महाबळेश्वर 30.1, मालेगाव 41 नाशिक 37.7, सांगली 40.3, सातारा 39.6 आणि सोलापूर 42, मुंबई 34 पॉईंट चार ,सांताक्रुज 34 पॉईंट एक ,अलिबाग 33.5, औरंगाबाद 40 अंश सेल्सिअस, परभणी 41.3, नांदेड 42.6, अकोला 43.2, अमरावती 41.2 , ब्रम्हपुरी 41.5 ,चंद्रपूर 44.2, गोंदिया 41.5, नागपूर 42 पॉईंट एक ,वाशिम 42, वर्धा 42.8