हॅलो कृषी ऑनलाईन : अनेकदा पेरणीपूर्वी मेहनत घेऊन मशागत केली असली तरी देखील तण हे उगवून येतातच. त्यामुळे पिकांची वाढ नीट होत नाही. त्यामुळे तानांचा योग्य वेळी बंदोबस्त करणे महत्वाचे असते. त्याकरिता योग्य पद्धतीने तणनाशकांचा वापर करावा लागणार आहे.
तणनाशकाची निवड
–तणाचे व्यवस्थापन हा एक उत्पादनवाढीच्या अनुशंगाने महत्वाचा घटक आहे.
–आतापर्यंत पीक उगवून आल्यावर तणाच्या नियंत्रणाबाबत उपाययोजना केली जात होती.
–पण आता पीक उगवण्यापूर्वीच तणाचे नियंत्रण केले जात आहे.
–पेरणीनंतर पीक उगवणी पुर्वी एकदल पिकांमध्ये ऍट्राझीन, द्विदल पिकासाठी पेंडीमेथिलिन ही तणनाशके वापरावीत.
–तर उभ्या पिकातील तणनियंत्रणासाठी सुद्धा तणनाशकांचा वापर करता येतो.
–मात्र त्यासाठी पिकांचा वर्ग माहीत असणे आवश्यक आहे.
— उभ्या पिकांमध्ये तणनाशकांचा चांगला परिणाम दिसण्यासाठी तने दोन ते चार पानावर असतांना फवारणी करावी.
पिकनिहाय तणनाशके
–तणनाशकाची फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा. तर फवारणीसाठी पाठीवरील साधा फवारणी पंप वापरावा.
–फवारणीचाअंश पिकावर जाऊ नये यासाठी वाऱ्याचा वेग कमी असताना फवारणी करावी.
–हरभरा हे पीक उगवण्यापूर्वी पेंडीमेथिलिन 2.5 लिटर हे तणनाशक प्रति हेक्टरी 300 लिटर पाण्यात मिसळून फवारावे लागणार आहे.
–फवारणी केल्यानंतरही सहा आठवड्याने खुरपणी ही शेतकऱ्यांना करावीच लागणार आहे.
मका
वेळ- पिक उगवणीपुर्व ऍट्राझीन (50 डब्ल्यू पी ) 1000 ग्रॅम हे 300 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टर क्षेत्रावरील पिकावर फवारणी करता येणार आहे. रब्बी हंगामाती कांद्याही उगवण्यापूर्वी ऑक्सीफ्लोरफेन एक लिटर किंवा पेंडीमेथिलिन 2.5 लिटर हे 300 लिटर पाण्यात मिसळून एक हेक्टरावरील क्षेत्रावर फवारणी करावी लागणार आहे. मात्र, फवारणी करुनही सहा आठवड्यांनी पुन्हा कांद्याची खुरपणी ही करावीच लागणार आहे.
करडई
यंदा करडईच्या क्षेत्रामध्ये वाढ होताना पाहवयास मिळत आहे. करडई उगवण्यापूर्वी ऑक्सिफ्लोरफेन एक लिटर हे तणनाशक 300 लिटर पाण्यात मिसळून एक हेक्टरवरील पिकावर फवारणी करता येणार आहे. यामुळे पिक उगवून येईपर्यंत तण नियंत्रणात येईल पण पुन्हा पेरणीनंतर सहा आठवड्यांनी एक खुरपणी ही करावीच लागणार आहे.
काय होईल फायदा?
पेरणीपूर्व फवारणीचे प्रमाण आता वाढत आहे. कारण पूर्वी पिकांची उगवण होण्यापूर्वीच तण वाफत होते. त्यामुळे खुरपणीवर अधिकचा खर्च करुनही पिक जोमात येत नव्हते. पण आता पेरणीपुर्वच तणनाशकाची फवारणी केली जात आहे. यामुळे अधिकचा खर्च होत असला तरी पिकांची वाढ जोमाने होते. शिवाय पेरणीनंतर काही काळ खुरपणी करण्याची आवश्यकता भासत नाही. हे तणनाशकाचे फायदे आहेत.
संदर्भ : टीव्ही -९